Health Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : तुम्ही सुद्धा सतत रेड मीट खाताय? ठरु शकते आरोग्याला घातक !

कोमल दामुद्रे

Health Tips : मटणामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, आयन आणि जिंकसारखे अनेक पोषकतत्वे उपलब्ध असतात. हाय प्रोटीन असल्यामुळे लोक मटणाचे जास्त प्रमाणात सेवन करतात. परंतु मटणाचे अत्याधिक सेवन तुमच्या हाडांसाठी हानिकारक ठरू शकते.

खास करून रेडमीटच सेवन तुमचे रक्त ऍसिडिक करते आणि तुमच्या हड्ड्या कमजोर करते. मिटमध्ये भरपूर मात्रामध्ये प्रोटीन उपलब्ध असते. काही लोकांना असं वाटतं की, ते जेवढं मीटचं सेवन करतील तेवढेच त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीन निर्माण होईल.

परंतु, प्रोटीनसाठी फक्त मीटवरती निर्भर असणे हे तुमच्या स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरू शकते. खासकरून एनिमल प्रोटीन हाडांना कमजोर करते. बऱ्याच अध्ययनांमध्ये सांगितले आहे की प्लांट बेस्ट प्रोटीनच्या तुलनेमध्ये एनिमल बेस्ट प्रोटीन हाडांना कमजोर करते. अनेक रिसर्च नुसार जे लोक जास्त प्रमाणात मटणाच सेवन करतात. त्यांना ओस्टीयोपोरोसिस आणि फ्रॅक्चर होण्याची संभावना जास्त असते.

1. नॉनव्हेजचं सेवन केल्याने खरोखर हाड कमजोर होतात का ?

  • मटण (Meat) किंवा प्लांट बेस्ट प्रोटीनचे सेवन केल्याने हाडांना कशा पद्धतीने प्रभावित केले जाते.

  • यावरती पोषण विशेषतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी नुकत्याच त्यांच्या इंस्टाग्राम हॅण्डल वर एक पोस्ट शेअर केली आहे.

  • ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की, " हाय प्रोटीन डाएटमुळे आपल्या हाडांचे स्वास्थ्य प्रभावित होऊ शकते आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे देखील होऊ शकते. प्रोटीन हाडांच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे .

  • परंतु जास्त प्रमाणात एनिमल प्रोटीन त्याचबरोबर विशेष रूपामध्ये रेड मीट हे वास्तवात तुमच्या हाडांना नुकसान पोहोचवू शकते.

  • त्यांनी पुढे असेही सांगितलं की, गोष्ट जेव्हा एनिमल प्रोटीनची येते तेव्हा तिला हाडांच्या संरचनेसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

  • प्रोटीन हाडांच्या संस्थेसाठी आवश्यक तर आहे. परंतु जास्त प्रमाणात मटणाचे सेवन केले तर तुम्हाला त्याचे नुकसान पोहोचू शकते.

  • प्रोटीनसाठी तुम्हाला फक्त रेड मीटवर अवलंबून राहायची गरज नाही आहे.

  • डेअरी प्रोडक्ट, चिकन, मासे (Fish) आणि प्लांट बेस्ट प्रोटीनच्या सोर्सेसला शामील केले पाहिजे.

Health Tips

2. प्रोटीनसाठी मटणावर अवलंबून राहणे आहे चुकीचे :

  • तज्ज्ञांनी सांगितले की, तुमच्या प्रोटीन इंटेक्समध्ये भरपूर प्रमाणात फळे, भाज्या आणि दररोज लागणारे अन्नधान्य असेल पाहिजे.

  • पोषण विशेष तज्ज्ञांच्या मते, मटणामध्ये हाय फॉस्फरस टू कॅल्शियम रेशो असतो जो कॅल्शियम उत्सर्जन ज्यामध्ये युरीन मार्फत कॅल्शियम शरीराबाहेर (Health) टाकले जाते. ही समस्या वाढत जाते आणि हाडांसाठी खनिजे कमी पडण्याचे कारण बनते.

3. रिसर्च :

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित असलेल्या 2024 च्या एका अध्ययनामध्ये सांगितले आहे की जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात कॅल्शियमचे सेवन करता. तेव्हा प्रोटीन तुमच्या हाडांच्या स्वास्थ्यावर सकारात्मक प्रभाव पडते. अशातच अनेक अध्ययनांमध्ये सांगितले आहे की प्लांट बेस्ट खाद्यपदार्थांमध्ये वृद्धी आणि एनिमल बेस्ट खाद्यपदार्थांमध्ये कमी असल्याने हृदयरोग, टाईप टू डायबिटीज (Diabetes), कॅन्सर (Cancer) अशा प्रकारच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

4. आहार संतुलित असणे गरजेचे आहे :

  • प्लांट बेस्ड आणि एनिमल बेस्ड या दोन्ही प्रोटीन मध्ये अमिनो ऍसिडची संचार ना वेगवेगळी असते त्यामुळे या दोघांना एकमेकांच्या जागेवर रिप्लेस केले जाऊ शकत नाही.

  • परंतु या दोघांमध्ये संतुलन बनवले जाऊ शकते. भरपूर प्रमाणात रेडमीट खाल्ल्याने डायबिटीज, हृदयरोग, कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढू लागतो. त्यामुळे आपल्या आहारामध्ये कोणताही मोठा बदल करण्याआधी हेल्थ एक्स्पर्टचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT