Skin Care Tips freepik
लाईफस्टाईल

Skin Care Tips: तुम्ही पण चेहऱ्यावर दही लावता का? जाणून घ्या त्याचे तोटे

Skin Care Tips: चेहऱ्यावर दही लावणे त्वचेसाठी लाभकारी ठरू शकते, मात्र ते अत्यधिक किंवा चुकीच्या पद्धतीने वापरल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

Dhanshri Shintre

लोक अनेकदा सांगतात की दही चेहऱ्याचा गोरापणा वाढवते, परंतु हॅट्स ऑफ असं काही नाही. दही चेहऱ्याची घाण आतून साफ करतं आणि त्वचेला एक नैसर्गिक चमक देते. त्याचे मुख्य फायदे म्हणजे त्वचेला हायड्रेशन मिळवून ताजगी देणं, पण त्याने गोरेपणाचा इफेक्ट कधीही नाही होतो. काही लोक अधिक गोरे होण्यासाठी जास्त दही वापरण्याचा प्रयत्न करतात, परंतु ह्यामुळे चांगले परिणाम ऐवजी हानिकारक होऊ शकतात. जास्त दही वापरल्यामुळे त्वचेवर कधी-कधी इन्फेक्शन किंवा इरिटेशन होऊ शकते. त्यामुळे दही वापरण्याचा योग्य प्रमाण ठेवणे आणि अधिक जाणून घेणे आवश्यक आहे.

अत्यंत कोरडेपणा किंवा चिडचिड

- जर तुम्हाला वाटत असेल की दररोज चेहऱ्यावर दही लावल्याने चेहरा चमकतो तर हे जाणून घ्या की ज्याप्रमाणे दह्यामुळे चेहरा चमकतो, त्याचप्रमाणे तो चेहरा कोरडा देखील होतो.

- खरंतर, दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेला एक्सफोलिएट करते.

- त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो.

अ‍ॅलर्जीची समस्या वाढते

- आजकाल अनेकांना अ‍ॅलर्जीसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

- अशा परिस्थितीत, जर तुम्ही ऍलर्जीनंतर चेहऱ्यावर दही लावले तर चेहऱ्यावर जळजळ होण्याची समस्या वाढू शकते.

- जर जळजळ आणि खाज वाढत असेल तर घरगुती उपाय करू नका, त्याऐवजी थेट डॉक्टरकडे जा.

सनबर्नचा धोका असतो.

- दही लावल्यानंतर जर तुम्ही उन्हात बाहेर गेलात तर चेहऱ्यावर सनबर्न होऊ शकते.

- कारण दह्यामध्ये नैसर्गिक आम्ल असतात, ज्यामुळे त्वचा सूर्यप्रकाशासाठी संवेदनशील बनू शकते.

- म्हणून, फक्त संध्याकाळी दही खाण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना कुणाची? सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरेसेनेला फटकारले; बेजबाबदार वक्तव्य थांबवा

PM Modi UAE Visit: तेल साठे ते एलपीजी पुरवठा; पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळाले?

Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

Shocking: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, २ महिलांचे केस कापून अर्धनग्न करत धिंड काढली

SCROLL FOR NEXT