सुप्त भद्रासन
सुप्त भद्रासन Saam Tv
लाईफस्टाईल

Daily योग: पोटाच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी करा सुप्त भद्रासन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निरोगी आयुष्य सर्वांनाच हवं असतं, पण त्यासाठी लागणारा पुरेसा वेळ कोणाकडेच नसतो. दररोजची धावपळ, ऑफिसच्या कामांचा ताण यामुळे नियमित योगासने, व्यायाम करणे शक्य होत नाही. मात्र निरोगी आयुष्यासाठी शरीर सक्रिय ठेवणं गरजेचं आहे. बदललेली जीवनशैली, अवेळी आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयी यांमुळे पोटाशी निगडीत समस्या अनेकांना त्रस्त करत आहेत. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी नियमित सुप्त भद्रासनाचा सराव सरावा.

सुप्त भद्रासन कसे करावे?

जमिनीवर किंवा योग मॅटवर सरळ पाठीवर झोपा. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवून त्या पायाची टाच डाव्या पायाच्या दिशेला ठेवा. हीच कृती आता डाव्या पायाने करून दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांना चिटकवा. आता दोन्ही हात जमिनीवर सरळ ठेवा.

सुप्त भद्रासन करण्याचे फायदे कोणते?

- स्वास्थ्य, आरोग्य पुन्हा प्राप्त करून देणारे हे आसन आहे.

- अंडाशय, प्रोस्टेट ग्रंथी, मूत्रपिंड आणि मूत्राशय सक्रिय करण्यास मदत करते.

- शांतता आणि विश्रांती मिळते.

- निद्रानाशाची समस्या दूर करण्यास मदत मिळते.

- पचनयंत्रणा आणि प्रजनन प्रक्रियेचे कार्य सुरळीत होते.

- मासिक पाळीचे विकार, रजोनिवृत्ती, वंध्यत्व आणि आतड्यांच्या हालचाली सुलभ करते.

- चिंता, ताण, तणाव, नैराश्य कमी करण्यास मदत होते.

- पाठदुखीसाठी हे आसन फायदेशीर ठरते.

- कमरेखालील सांधे मोकळे होतात.

- हे आसन करताना ओटीपोटाचा भाग, मांड्याचा आतील भाग आणि गुडघ्यांना आवश्यक प्रमाणात चांगला ताण जाणवतो.

- कमरेखालील आणि गुडघ्यांवरील स्नायूंना पुरेसा ताण मिळतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू

Today's Marathi News Live: गुन्हेगारांचं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदात्तीकरण; गुंड गजानन मारणेचा व्हिडिओ व्हायरल

Solapur Crime News: दुहेरी हत्याकांडाने माळशिरस हादरले; दिवसाढवळ्या चाकूने भोसकून दोघांची हत्या

Matchstick Factory Video : माचीसच्या काड्या कशा बनवतात माहितीये? पाहा फॅक्टरीतला व्हिडिओ

Sharad Pawar News: '...म्हणून २००४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी सोडली'; छगन भुजबळांचे नाव घेत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट!

SCROLL FOR NEXT