How To Control Sugar Level Saam Tv
लाईफस्टाईल

How To Control Sugar Level : शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी रोज करा हे आसन, जाणून घ्या पद्धत

Diabetes : मधुमेह रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने होतो

कोमल दामुद्रे

Diabetes Health Tips : मधुमेह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील सर्वाधिक मधुमेह रुग्णांची संख्या भारतात आहे. मधुमेह रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने होतो. मधुमेह आजारासाठी श्वास लागणे, वारंवार लघवी होणे, मळमळ होणे,दृष्टी कमजोर होणे ही लक्षणे कारणीभूत असतात.

तुम्ही जर याची योग्य काळजी घेतली नाही तर मधुमेह अधिक धोकादायक ठरू शकतो. औषधांसोबतच नियमित व्यायाम करून तुम्ही ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवू शकता. नियमितपणे वज्रासन करून तुम्ही रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवू शकता तसेच हा योग (Yoga) केल्याने तुम्ही अनेक आजारांवरही (Disease) मात करू शकता. चला तर मग जाणून घेऊया वज्रासन या योगाबद्दल संपूर्ण माहिती.

1. वज्रासन करा

वज्रासन म्हणजे वज्रमुद्रामध्ये योगासने करणे. तर वज्र हा संस्कृतमधील शब्द आहे आणि वज्रचा शाब्दिक अर्थ कठोर किंवा मजबूत असा होतो. वज्रासन हा योग शरीरातील ऊर्जा एकत्रित आणि व्यवस्थित राहण्यास सहकार्य करतो. तसेच रक्तातील साखरेचे (Sugar) प्रमाण नियंत्रणात राहते.

वज्रासन योगबद्दल तज्ज्ञ सांगतात की, वज्रासन केल्याने स्वादुपिंड आणि यकृत सक्रिय होते. साध्या भाषेत सांगायचे झाले तर वज्रासन पोटाच्या अवयवांना उत्तेजित करते. त्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन सुधारते. म्हणून मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी दररोज वज्रासन करणे गरजेचे आहे. वज्रासन हे योगासने करणे खूप सोपे आहे आणि कधीही करता येते.

2. वज्रासन कसे करावे?

वज्रासन योग करण्यासाठी सपाट जमिनीवर प्रथम मॅट टाका. त्यानंतर पायाचा गुडघा वाकवून व्यवस्थित बसा. यासाठी तुम्ही वरील जोडलेल्या चित्राची मदत घेऊ शकता. या दरम्यान शरीर सरळ ठेवून दोन्ही हात पुढच्या गुडघ्यावर ठेवा आणि आता डोळे बंद करा. नंतर हळूहळू दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. असा हा सोपा योग तुम्ही नियमितपणे करून ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

Maharashtra Rain Live News : - भर पावसात कृषिमंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर

Swara Bhaskar : मला डिंपल यादववर क्रश आहे, सगळे bisexual आहोत; स्वरा भास्करचं वक्तव्य, VIDEO

Loksabha: मुख्यमंत्री असो पंतप्रधान खुर्ची जाणारच; लोकसभेत सादर होणार विधेयक काय आहे, काय होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT