Meditation For Health : आपण मन:शांती, आनंद, आरोग्य, अधिक शक्ती, सुधारित नातेसंबंध, आणि परिपूर्ण जीवनाच्या शोधात आहात का? तुम्हाला तणाव मुक्त आणि चिंतामुक्त व्हायचे आहे का? आधुनिक जीवनात व्यग्रतेमुळे आपले शरीर खूप थकून जाते. ज्यामुळे दिवसाच्या शेवटी खूप तणाव जाणवतो. सर्व प्रयत्न करूनही तणाव काही लवकर दूर होत नाही. अशा परिस्थितीत शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगासने आणि ध्यानधारणा करण्याइतके दुसरे काही सर्वोत्तम असूच शकत नाही. शतकानुशतके केल्या जाणाऱ्या विधींपैकी एक म्हणजे त्राटक ध्यान (Meditation). त्राटक म्हणजे टक लावून पाहणे. असे मानले जाते की जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट वस्तूवर नजर एकटक लावून ठेवतो आणि शरीर अजिबात न हलवता देखील मन आपोआप स्थिर होते त्याला त्राटक ध्यान म्हटले जाते. (Health)
ध्यान केल्याने तुम्हाला हे सर्व फायदे आणि बरंच काही मिळू शकते. तुमच्या शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. चला तर मग पाहूयात ध्यानाचे फायदे
१. ध्यान आपल्याला मानसिक सशक्त बनवते, ज्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत प्रसन्न राहू शकतो.
२. आपल्याला आंतरीक शांती प्राप्त होते आणि आसपासच्या परीस्थितीवर प्रभाव करू शकतो.
३. भावनिक लवचिकता वाढते.
४. प्रतिक्रिया व्यक्त करणे कमी होते. प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते.
५. हा मनाला ताण-तणाव मुक्त कारण्याचा मार्ग आहे
१. शांत परिसर -
शांत परिसरामध्ये ध्यान करणे योग्य. यामुळे अडथळे दूर होऊन, तुम्ही ध्यानामध्ये खोलवर जाऊ शकता.
२. नियमित ध्यान करा -
दिवसातून दोनवेळा, सातत्याने ध्यान करणे उत्तम. यामुळेच प्रत्येक दिवसागणिक तुम्हाला ध्यानाचे सकारात्मक प्रभाव जाणवू लागतात.
३. साथीदारांसह ध्यान करा -
आपल्या जवळच्या साथीदारांच्या सोबत समुहाने ध्यान करा, यामुळे तुमचे अनुभव सखोल बनतील, शिवाय तुम्हाला सातत्य ठेवणे मदतीचे होईल.
४. ध्यानापुर्वी हलके शारीरिक व्यायाम करा –
यामुळे शरीरातील विविध अवयवांमधील ताण आणि तणाव निघून गेल्याने आरामदायी व्हाल आणि ध्यान आणखी आनंददायी बनेल.
५. विचारांचे निरीक्षण करा -
विचारांना रोखण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना येऊ द्या. त्यामुळे ध्यान विनासायास बनेल.
६. घाई करू नका -
दहा-पंधरा मिनिटांचे ध्यान होतेय नां पहा. डोळे उघडण्यासाठी घाई करू नका.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.