Evil eye remedies Tuesday saam tv
लाईफस्टाईल

Mangalwar Upay: वाईट नजर लागण्यापासून वाचण्यासाठी मंगळवारी करा हे उपाय; हनुमानजीही होती प्रसन्न

Evil eye remedies Tuesday : अनेकदा आपल्या कामांमध्ये अचानक अडथळे येतात, आरोग्याच्या समस्या येतात किंवा घरात कलह निर्माण होतो. मंगळवार हा भगवान हनुमानजींना समर्पित दिवस आहे. या दिवशी काही विशिष्ट उपाय केल्यास नजरदोष दूर होतो

Surabhi Jayashree Jagdish

मंगळवार हा दिवस संकटमोचक हनुमानजींना समर्पित मानला जातो. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा एका देवाला समर्पित करण्यात आलेला आहे. या दिवशी जर भक्तीभावाने हनुमानजींची आराधना केली, तर ते आपल्या भक्तांचं संकट दूर करतात आणि विशेषतः दृष्टदोषापासूनही संरक्षण करतात.

मंगळवारच्या दिवशी काही खास उपाय केल्यास घरात सुख-शांती नांदते. त्याचप्रमाणे वाईट नजर लागली असेल तर त्याचा परिणाम दूर राहतो. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या आयुष्यात सतत अडथळे येतायत तर मानसिक अस्वस्थता जाणवतेय किंवा घरात नकारात्मक वातावरण निर्माण झालंय. तर काही सोपे उपाय मंगळवारी केल्यास निश्चितच फायदा होतो.

कापूराचा उपाय

मंगळवारी घरात कपूर लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्याचप्रमाणे जर एखाद्याला वाईट नजर लागली असेल तर कपूराचे ५ छोटे तुकडे घ्या आणि त्या व्यक्तीच्या डोक्याभोवती सात वेळा उलट दिशेने फिरवा. मग ते तुकडे एका मातीच्या भांड्यात ठेवून जाळा. हा उपाय दृष्ट काढण्यासाठी प्रभावी मानला जातो.

हनुमानजींची पूजा करा

मंगळवारी संकटमोचक हनुमानजींची मनापासून पूजा करा. त्यांना सिंदूर अर्पण करा आणि हनुमान चालीसा पाठ करा. मंदिरात जाऊन हनुमानजींच्या चरणांवरील सिंदूर आपल्या कपाळावर लावल्यास, त्यांच्या विशेष कृपेचा लाभ होतो.

मीठ आणि राईचा उपाय

जर एखाद्याला नजर लागल्याचं वाटत असेल तर मंगळवारी एक मूठभर मीठ आणि थोडी राई घ्या. हे मिश्रण त्या व्यक्तीच्या डोक्याभोवती सात वेळा फिरवा आणि ते घराच्या बाहेर दूर फेकून द्या. हा उपाय अनेक वर्षांपासून घरगुती नजर काढण्यासाठी केला जातो.

लवंगाचा उपाय

मंगळवारी हनुमानजींच्या पूजेमध्ये त्यांच्या समोर लावण्यात येणाऱ्या दिव्यात दोन लवंग टाका आणि दिवा लावा. असं केल्याने घरात असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. हनुमानजी संकटमोचक आहेत आणि अशी पूजा केल्याने ते आपल्या जीवनातील अडचणी, त्रास दूर करतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाना भानगिरे यांनी लुटला प्रचारादरम्यान क्रिकेट खेळण्याचा आनंद

Red Chilli Thecha Recipe: महिनाभर टिकेल असा लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा? वाचा रेसिपी अन् काही टिप्स

Women Investment Tips: कमी गुंतवणूक अन् जास्त फायदा, महिलांसाठी पैसे गुंतवणूकीच्या या 5 बेस्ट स्कीम

Viral Video : बेफाम दारू प्यायला अन् बार गर्लवर पैसे उधळले; नवी मुंबईतील पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : राजकीय दबावामुळे अधिकार्‍यांचे राजीनामे, अजित पवार स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT