Friday Remedies To Get money saam tv
लाईफस्टाईल

Friday Laxmi remedy: शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीचे 'हे' उपाय करा; आर्थिक संकटातून लगेच होईल सुटका

Wealth gain remedy Friday: शुक्रवार हा दिवस धन, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी लक्ष्मी माता आणि भौतिक सुखांचा कारक ग्रह शुक्र यांना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास आणि काही विशेष उपाय केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात

Surabhi Jayashree Jagdish

  • लक्ष्मी मातेचा नवीन फोटो पूजेसाठी आणा

  • सौभाग्यासाठी एक रुपयाचं नाणं देवीसमोर ठेवून शनिवारी जवळ बाळगा

  • आरोग्यासाठी देवी लक्ष्मीला शंख आणि मखाण्यांचा नैवेद्य अर्पण करा

हिंदू धर्मामध्ये शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो. लक्ष्मी ही धन, वैभव, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी आहे. त्यामुळे या दिवशी तिच्या भक्तीने जीवनात आर्थिक स्थैर्य, आनंद, सौभाग्य आणि घरात शांतता येते, असं मानलं जातं.

ज्योतिष्य शास्त्रांनुसार, काही खास उपाय जर शुक्रवारच्या दिवशी केले तर व्यक्तीच्या आर्थिक अडचणी दूर होतात. त्याचप्रमाणे व्यवसायात वाढ होते आणि घरगुती सुखातही भर पडते. हे उपाय करताना श्रद्धा, मनापासून भक्ती आणि सकारात्मक विचार ठेवणं आवश्यक आहे. शुक्रवारच्या दिवशी कोणते उपाय कोणते उपाय केले पाहिजेत ते जाणून घेऊया.

लक्ष्मी मातेचा फोटो देव्हाऱ्यात ठेवा

आपल्या घरातील देवघरात किंवा पूजेसाठी असलेल्या जागी शुक्रवारच्या दिवशी एक नवीन फोटो आणा. या फोटोमध्ये देवी लक्ष्मी कमळाच्या फुलावर विराजमान असलेली असावी. हा फोटो बाजारातून आणल्यावर ते घरातल्या मंदिरात स्थापन करा. त्यानंतर देवीला कमळाचे फूल अर्पण करा, धूप व दीप दाखवा आणि मनोभावे तिची पूजा करा.

सौभाग्यासाठी एक रुपयाचा उपाय

जर तुम्हाला आयुष्यात सौभाग्य आणि यश प्राप्त करायचं असेल, तर शुक्रवारच्या दिवशी एक रुपयाचं नाणं घ्या आणि ते आपल्या देवघरात लक्ष्मीमातेच्या समोर ठेवा. यानंतर देवी लक्ष्मीची विधीवत पूजा करा आणि त्या नाण्यालाही ओवाळा. रात्री ते नाणं लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळा आणि शनिवारी ते नाणं नेहमी तुमच्याजवळ ठेवा.

चांगल्या आरोग्यासाठी उपाय

शुक्रवारी सकाळी स्वच्छ स्नान करून जवळच्या लक्ष्मी मंदिरात जा. त्या ठिकाणी देवीला एक शंख अर्पण करा. त्याचप्रमाणे तूप आणि मखाणे यांचा नैवेद्य देवीला दाखवा. पूजन झाल्यावर दोन्ही हात जोडून देवीसमोर निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करा.

चांदीच्या कलशाचा उपाय

जर तुमचं उद्दिष्ट आर्थिक उन्नती करायचं असेल, तर हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. एका छोट्या मातीच्या किंवा चांदीच्या कलशात स्वच्छ तांदूळ भरा. त्यावर एक रुपयाचं नाणं आणि हळदीची एक छोटी गाठ ठेवा. यानंतर या कलशाला झाकण लावा, लक्ष्मीमातेची पूजा करा आणि कलशाला ओवाळा.

व्यवसायात यशासाठी देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा

व्यवसायात वाढ हवी असेल तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. मग शांत जागेवर आसनावर बसून देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा:

"ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः"

हा मंत्र कमीत कमी ११ वेळा म्हणावा. अधिक वेळाही म्हणू शकता. मंत्र जप करताना लक्ष्मीमातेच्या कमळावर बसलेल्या रुपाचं ध्यान करा आणि श्रद्धेने प्रार्थना करा. हा उपाय केल्याने व्यवसायात सकारात्मक बदल होतो, नवीन संधी मिळतात आणि अडथळे दूर होतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माजी आमदार सपकाळांनंतर आणखी एक निष्ठावंत शिलेदाराने सोडली साथ, उद्धव ठाकरेंना पुन्हा एक धक्का

Maharashtra Live News Update : ठाकरे बंधूंच्या दौऱ्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये

Gajar Recipe: गाजरचा फक्त हलवा नाही, तर हे 5 पदार्थ आजच घरी ट्राय करा

महायुद्ध अटळ! छोटीशी ठिणगी उडवेल युद्धाचा भडका, भारतालाही बसणार फटका

Korean Face Mask: घरच्या घरी बनवा कोरियन फेस मास्क; २ वापरात मिळेल ग्लोईंग सॉफ्ट चेहरा

SCROLL FOR NEXT