Wednesday Remedies saam tv
लाईफस्टाईल

Budhwar che Upay : बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाचे 'हे' उपाय करा; नशीब बदलण्यास वेळ लागणार नाही

Ganpati Bappa remedy Wednesday: हिंदू धर्मानुसार, बुधवार हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. गणपतीला विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता मानले जाते. या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केल्यास, ते भक्तांचे अडथळे दूर करतात

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मात बुधवारचा दिवस गणपती बाप्पाच्या पूजेचा अतिशय शुभ दिवस मानला जातो. आज 9 जुलै असून आजच्या बुधवारी मूल नक्षत्र आणि ब्रह्म योग आहे. त्यामुळे हा दिवस आणखी शुभ मानला जातो. या दिवशी गणपतीसह केतू ग्रहाचेही पूजन आणि उपाय केल्यास अनेक विघ्न, अडथळे दूर होतात. बुधवारच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत ते पाहूयात.

संकंटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी

जर तुमच्यावर वारंवार संकटं येत असतील, अडचणींपासून मुक्ती हवी असेल, तर आज मूल नक्षत्रात गणपतीची उपासना करा. आणि या शक्तिशाली मंत्राचा 21 वेळा जप करा: "वक्र तुण्डाय हुं". हा सहा अक्षरांचा मंत्र तुमच्या सर्व अडचणी दूर करतो.

घरात सुख-समृद्धी टिकवण्यासाठी

जर तुम्हाला घरात सुख समृद्धी हवी असेल तर बुधवारी केळं घ्या आणि तुमच्या मुलाला, किंवा भाचे-भाच्याला खायला द्या. असं केल्याने घरात आनंद आणि आर्थिक स्थैर्य टिकतं.

मंगलमय आयुष्य

बुधवारी हत्तीच्या दोन खेळण्यांची मूर्ती आणा, स्वच्छ पाण्याने धुवा आणि पूजास्थळी ठेवा. मग त्यांच्यासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. या उपायामुळे तुमच्या घरात शुभता आणि समृद्धी वाढते.

नोकरीशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी

बुधवारी तूप, साखर आणि पांढरे तीळ एकत्र करून लाडू तयार करा आणि गणपतीला अर्पण करा. जर हे करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल तर हे संपूर्ण साहित्य वेगवेगळं करून मंदिरात दान द्या. असं केल्याने नोकरीसंबंधी समस्या लवकरच दूर होतील.

नात्यांतील कटुता दूर करण्यासाठी

जर तुमच्या घरातील नात्यांमध्ये बुधवारी सकाळी स्नानानंतर, चिंचेचं एक पॅकेट घेऊन गणपतीच्या मंदिरात चढवा. हे केल्याने नात्यांतील कटुता दूर होते, आणि आपुलकी वाढते.

आयुष्यात गती हवी आहे?

बुधवारी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. यानंतर तुमच्या इष्टदेवाचं स्मरण करा आणि माथ्यावर केशराचा तिलक लावा. या साध्या उपायाने आयुष्याची गती टिकून राहते, अडथळे दूर होण्यास मदत होते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT