Diabetes Control Tips
Diabetes Control Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Control Tips : ब्लड शुगर लेव्हल नियंत्रण ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diabetes Control Tips : मधुमेह असणाऱ्या लोकांना नेहमी त्यांचे ब्लड शुगर लेव्हल चेक केले पाहिजे. ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल मध्ये ठेवणे फार गरजेचे आहे.जर मधुमेह रुग्णांनी खाण्यापिण्याकडे लक्ष दिले नाही तर त्यांचा ब्लड शुगर लेवल वाढू शकतो.

ब्लड शुगर वाढल्याने शरीर काही संकेत देते वजन कमी (Weight Loss) होणे, झोपेत अडचण येणे, पुस्ट नजर होणे,खूप तहान लागणे हे ब्लड शुगर लेवल वाढण्याचे काही लक्षणे आहे. ज्यांना मधुमेह आहे त्याने आहार व्यवस्थित वेळेवर घेतला पाहिजे. त्यामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रित जाते तसेच काही झोपण्यापूर्वी काम केल्यास तुमचे ब्लड शुगर (Sugar) लेव्हल नियंत्रित राहण्यास मदत होईल.

कॅफेनचे सेवन कमी करा -

रात्री झोपण्यापूर्वी मधुमेह रुग्णांनी चहा,कॉफी,चॉकलेट,सोडा,आईस्क्रीम याचे सेवन करू नये, त्यामुळे तुमची झोप कमी होते. त्यासोबतच अल्कोहोलचे सेवन टाळले पाहिजे. मधुमेह रुग्णांची झोप पूर्ण होणे आवश्यक असते.कॅफेन्युक्त पदार्थाचे सेवन केल्याने त्यांची झोप मोड होते त्याचा परिणाम त्यांच्या ब्लड शुगर लेवल वर होतो.

पुरेशी झोप घ्या -

मधुमेह रुग्णांना ब्लड शुगर लेवल कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी पुरेशी झोप होणे महत्त्वाचे असते त्यामुळे दररोज सात ते आठ तास त्यांनी झोपले पाहिजे त्यामुळे त्यांना तणाव येत नाही चिडचिड होत नाही आणि त्यांचे रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रित रहाते.

व्यायाम करा -

झोपण्यापूर्वी व्यायाम केल्याने रुग्णांच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे असते व्यायाम नाहीतर योगासन तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होईल पण तुम्ही व्यायाम करून लगेच झोपू नका व्यायाम केल्याने एक किंवा दीड तासाने तुम्ही झोपू शकता. त्यामुळे तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल कंट्रोल मध्ये राहते.

रात्री हलका आहार घ्या -

शक्यतो रात्री सर्वांनीच काही तरी हलका आहार घेतला पाहिजे.रात्री चे जेवण ८ वाजायचे अगोदर केले पाहिजे.रात्री उशिरा जेवण करणायची सवय असेल तर ती अताच बदली करा नाहीतर उशिरा जेवल्यामुळे तुमच्या पचनसंस्थे वर वाईट परिणाम होतो त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी बिघडू शकते.रात्री झोपण्यापूर्वी लॅपटॉप आणि फोनचा वापर करू नका.

ब्लड शुगर लेव्हल तपासत रहा -

मधुमेह रुग्णांनानी रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर त्याचे रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले पाहिजे.

पुढील दिवसाच्या खाण्याचे नियोजन करा -

मधुमेह रुग्णांसाठी योग्य आहार असणे फार गरजेचे असते बऱ्याच वेळा ते विसरून जातात काय खायचे नाही.त्यामुळे अगोदर रात्री एक यादी तयार करून त्या मध्ये कोणता आहार घेयायचा आहे याची नोंद करून तयारी करून ठेवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

Nashik News: सासरच्या छळाला कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल, 2 मुलांसह संपवलं जीवन

Weekly Horoscope: उद्यापासून सुरू होणार या 5 राशींचे अच्छे दिन, पुढील 7 दिवस जीवनात राहणार आनंद

Today's Marathi News Live: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची दोन मुलांसह शेततळ्यात आत्महत्या

Bhiwandi Fire: भिवंडीत प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग

SCROLL FOR NEXT