Allergy पासून मुक्तता मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय  Saan TV
लाईफस्टाईल

Allergy पासून मुक्तता मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

अॅलर्जीचे अनेक प्रकार आहेत. जेव्हा जेव्हा शरीर कोणत्याही पदार्थावर प्रतिक्रिया देते तेव्हा अॅलर्जी सुरू होते. आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे, आपण नकळत अॅलर्जीचे बळी होऊ शकतो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : आजकाल अॅलर्जीची (Allergy) समस्या सामान्य झाली आहे. जवळपास प्रत्येक व्यक्तीला कशाची ना कशाची अॅलर्जीचा सामना करत असते. तसे, अॅलर्जीचे अनेक प्रकार आहेत, जसे की क्रीम किंवा कॉस्मेटिकची अॅलर्जी, एखाद्या विशिष्ट प्रकारच्या अन्नाची अॅलर्जी, धूळ-माती, लोकरी-सूती कपडे, सूर्य, हवामान, अशा असंख्य कारणांमुळे अॅलर्जी होऊ शकते. कारण काहीही असो, पण आज आम्ही तुम्हाला तुमच्या अॅलर्जीवर मात करण्याचे काही उपाय सांगणार आहोत, जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

हे देखील पहा

अॅलर्जीचे प्रकार (Types of Allergy)

सुरुनातीलाच सांगितल्याप्रमाणे अॅलर्जी अनेक प्रकारच्या असतात, त्यांची लक्षणे देखील भिन्न आहेत. जसे- त्वचेवर पुरळ, खाज, मुरुम, चेहऱ्यावर आणि शरीरावर अनेक प्रकारचे व्रण, मुरुम इ. या दरम्यान, तुमची रोगप्रतिकारक शक्ती अॅलर्जी टाळण्यासाठी अॅंटीबॉडीज रिलीज करतात. या प्रकारची अॅलर्जी कधीकधी सामान्य असू शकते पण कधीकधी ती गंभीर रुप धारण करु शकते.

धूळ अॅलर्जी (Dust Allergy)

धूळांमुळे होणारी अॅलर्जी, जी सर्वात सामान्य आहे, परंतु बऱ्याच लोकांना यापासून मुक्तता मिळत नाही. धुळीमुळे होणाऱ्या अॅलर्जीची लक्षणे म्हणजे..

डोळे लाल होणे आणि खाज सुटणे

धुळीमुळे वारंवार शिंकणे

अचानक वाहणारे नाक

अचानक खोकला

अधूनमधून श्वास घेण्यास त्रास

छातीत घट्टपणा

शरीराला खाज येणे

स्टीम (Steam)

धूळीमुळे होणाऱ्या अॅलर्जीसाठी, आपण स्टीम घेऊ शकता. जर तुम्ही सुमारे 10 मिनिटे स्टीम घेत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

अॅलर्जीवर उपाय

आइस क्यूब

त्वचेवरील अॅलर्जीपासून मुक्तता मिळवण्यासाठी, आपण बर्फाच्या तुकड्यांची मदत घेऊ शकता. तुम्ही स्वच्छ कपड्यात बर्फाचे तुकडे टाकू शकता आणि अॅलर्जीक भागात लावू शकता, यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

खोबरेल तेल (Coconut Oil)

शरीरावर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अॅलर्जीसाठी तुम्ही नारळाचे तेल वापरू शकता. नारळाच्या तेलात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेच्या अॅलर्जीसाठी रामबाण उपाय आहे. यासाठी तुम्हाला फक्त कोमट नारळाचे तेल घेऊन ते अॅलर्जीक भागावर लावावे आणि रात्रभर सोडावे.

कोरफड (Aloe Vera)

कोरफडीच्या औषधी गुणधर्मांबद्दल आपल्याला माहिती असेलच. त्वचेच्या अॅलर्जीपासून मुक्त होण्यासाठी कोरफडसारखा दुसरा कोणताच पर्याय नाही. त्वचेवरील अॅलर्जीमुळे

शरीरावर खाज सुटणे आणि जळजळ होण्यापासून आराम मिळतो. यासाठी तुम्ही कोरफडीचे जेलचाही वापर करु शकता. कोरफड जेल अॅलर्जीक भागावर लावा आणि 30 ते 40 मिनिटांसाठी तसेच सोडा आणि काही वेळानंतर स्वच्छ करा. आपण ते नियमितपणे वापरू शकता.

कडुलिंबाची पाने (Neem Leaves)

कडुलिंबामध्‍ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. कडुलिंबाच्या पानांच्या वापरामुळे त्वचेवरील अॅलर्जीपासून तुम्ही काही मिनिटातच मुक्तता मिळवू शकता. यासाठी रात्रभर कडुलिंबाची पाने पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची पेस्ट बनवा आणि अॅलर्जीक भागावर लावा. यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monkey: माकडांना पकडा अन् ६०० रुपये मिळवा; राज्य सरकारकडून निर्देश जारी

Maharashtra Live News Update: श्री क्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्टी उत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT