Heart attack problem in Marathi, heart attack symptoms in marathi, heart care tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Heart Attack : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्वरीत हे काम करा, वाचू शकतो रुग्णाचा जीव

हृदयविकाराचा झटका आल्यावर लगेच काय करावे ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हृदयविकाराचा झटका आजकाल कोणालाही येऊ शकतो. सतत औषधांचे सेवन, फास्ट फूड, वाढलेला रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण यापैकी कोणतेही कारण हृदयविकाराच्या झटक्यासाठी पुरेसे आहे. (Heart attack problem in Marathi)

हे देखील पहा -

हृदयविकाराचा झटका साधारणपणे १५ मिनिटांपेक्षा जास्त काळाचा असतो. काही लोकांना छातीत हलके दुखते, तर काही लोकांना जास्त-तीव्र वेदना होतात. रुग्णाला दवाखान्यात नेईपर्यंत आवश्यक उपचार देणे अत्यंत गरजेचे आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपण रुग्णाचा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे असते. हृदयविकाराचा झटका आल्यावर आपण काय करायला हवे? रुग्णाला ट्रीटमेंट कशी मिळेल ? ट्रीटमेंटसाठी आपल्याला कोणत्या गोष्टी माहित असणे अधिक गरजेचे आहे ते पाहूया.

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर या गोष्टींवर लक्ष ठेवा

१. हृदयविकाराच्या झटक्यातील सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे छातीत अस्वस्थता व दाब जाणवल्यासारखे वाटणे.

२. छातीत काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ दुखते किंवा अचानक दुखणे थांबून पुन्हा सुरु होते.

३. तसेच छातीच्या दुखण्या त्याव्यतिरिक्त शरीराच्या इतर भागातही दुखू लागते हात, पाठ, मान किंवा पोटात दुखू लागते.

४. घाम येऊन शरीर थंड पडणे, मळमळ किंवा उलट्या होणे, चक्कर येणे, अपचन, थकवा यासारखी लक्षणे देखील दिसू शकतात. हे लक्षणे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक दिसून येतात.

रुग्णाला झटका आल्यावर लगेच काय करावे

१. रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपत्कालीन क्रमांकांवर कॉल करा व जवळच्या रुग्णालयात घेऊन जा.

२. हृदयविकाराचा झटका (Heart attack) आल्यानंतर त्या व्यक्तीला ऍस्पिरिन चघळण्यास किंवा गिळण्यास सांगा. ऍस्पिरिन गोठलेले रक्त पातळ करुन रक्ताभिसरण सुरळीत करते. ऍस्पिरिनची ऍलर्जी असल्यास त्याचे सेवन करु नका. डॉक्टरांशी संपर्क साधा.

३. झटका आल्यानंतर डॉक्टरांनी (Doctor) दिलेले नायट्रोग्लिसरीन औषध घ्या.

४. रुग्ण बेशुद्ध पडला असेल तर त्याला आपल्याकडे किंवा स्वयंचलित बाह्य डिफिब्रिलेटरचा वापर करा. त्याचा वापर करण्यासाठी त्या डिव्हाइसच्या सूचनांचे अनुसरण करा. यामुळे हृदयाचे ठोके वेगवान किंवा मंद होतात.

५. तसेच रुग्ण बेशुद्ध असेल तर त्याला CPR देणे सुरू करा. रक्तदाब आणि हृदयाचे ठोके सामान्य करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. रूग्णाच्या छातीच्या मध्यभागी जोरदार आणि तीव्रतेने दाबा. हे एका मिनिटात १०० वेळा करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND Vs SA: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कशी असणार भारताची प्लेईंग ११; या खेळाडूचा पत्ता होणार कट?

Sunscreen Sun Protection: दररोज सनस्क्रीन लावल्याने व्हिटॅमिन D ची कमतरता होते का?

Vastu Tips: घरात झाडू कोणत्या दिशेला ठेवावा? तुम्हीही चूक करत असाल तर योग्य दिशा जाणून घ्या

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी आल्यानंतर शेतात रमले

Salim Khan: सलमान खानचे वडील सलीम खान यांच्यावर केली डीएसए प्रक्रिया; नक्की काय आहे ही प्रोसेस आणि का करतात?

SCROLL FOR NEXT