Health Tips Auric
लाईफस्टाईल

Yoga Tips: वायू प्रदूषणामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी 'ही' योगासने करा; दूर होईल श्वासासंबंधीचा त्रास

Health Tips : योग आणि प्राणायामाच्या माध्यमातून तुम्ही वायू प्रदूषणाचा त्रासा वाचवू शकता.

Bharat Jadhav

Yoga Tips:

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि दिल्लीमध्ये प्रदूषण वाढलं आहे. मेट्रो शहरासह राज्यातील इतर शहरामध्ये सुद्धा वायू प्रदूषण वाढू लागलं आहे. प्रदूषित हवेमुळे लोकांना अनेक श्वासासंबंधीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या वायू प्रदुषणामुळे अनेकांना श्वसनाचे त्रास सुरू झाले आहेत. वायू प्रदुषणामुळे होणारे त्रास कमी करण्यासाठी काही योगासने करणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला त्या योगासनाची माहिती देणार आहोत. (Latest News)

अनुलोम-विलोम : अनुलोम विलोम केल्याने श्वसनाचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. रोज साधारण ५ ते ७ मिनिटे अनुलोम-विलोम केल्याने फुफ्फुसे मजबूत होतात. अनुलोम विलोम करताना आधी उजव्या नाकाच्या एका नलिकेतून श्वास घ्या आणि डाव्या नालिकेतून श्वास सोडा. हीच कृती डाव्या नालिकेतून करावी. उजव्या नलिकेतून श्वास घेऊन झाल्यानंतर डाव्या नलिकेतून श्वास घ्यावा आणि उजव्या नालिकेतून श्वास सोडावा.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कपालभाटी : कपालभाटी करण्यासाठी पालथी मांडी घालून पाठीचा कणा ताठ ठेवत सरळ बसा. त्यानंतर पोटाचा खालचा भाग आत ओढा. यानंतर नाकातून वेगाने श्वास सोडा. थकवा येईपर्यंत हे करत रहा. असं केल्यानं शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. त्याशिवाय आपले मन देखील शांत राहते. कपालभाटी केल्याने श्वासोश्वास संथ होऊन शरीर स्थिर होते.यामुळे आपले रक्तदेखील शुद्ध होते.

भस्त्रिका : भस्त्रिका प्राणायाम फुफ्फुस मजबूत करण्यासाठी फायदेशीर असते. पोटाची चरबी कमी करण्यासाठीही भस्त्रिका उपयुक्त आहे. तसेच आपली भूक देखील वाढते. भस्त्रिका केल्याने श्वासोश्वासचा त्रास देखील कमी होतो. वायू प्रदूषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही दररोज थोडा वेळ भस्त्रिका प्राणायाम करावा.

वाह्य : वाह्य प्राणायामानेही फुफ्फुसांना फायदा होतो. हे करण्यासाठी सर्वात प्रथम खाली बसून दीर्घ श्वास घ्यावा. त्यानंतर श्वास रोखून धरून तीनवेळा सोडावा. श्वास बाहेर सोडताना पोट आणि डायाफ्रामचा वापर करावा. या क्रियेत श्वास सोडताना तुम्ही कोणत्याही अस्वस्थ स्थितीत असता कामा नये. हे योगासन नियमित सरावाने फुफ्फुसात शुद्ध हवा भरण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : मतदानाला सुट्टी, सूट द्याच, अन्यथा... सरकारचा आदेश जारी, नेमकं काय म्हटलं?

Apurva Nemlekar: 'रात्रीस खेळ चाले' फेम 'शेंवता'ची सिंगापूर ट्रिप, खास व्यक्तीसोबतचे फोटो केले शेअर

Maharashtra News Live Updates: शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

SCROLL FOR NEXT