नरक चतुर्दशी हा धनलाभासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो.
दक्षिण दिशेला दिवा लावल्याने आर्थिक संकटे कमी करता येतात.
लक्ष्मी मंत्रांच्या जपाने कर्ज आणि दारिद्रय कमी होते.
गोमती चक्र व कौड्या हे उपाय धनप्राप्तीसाठी प्रभावी आहेत.
यंदाच्या वर्षी छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशीचा सण १९ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. हा दिवस धनलाभ, सुख-समृद्धी आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. हिंदू श्रद्धेनुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास घरातील दारिद्रय नष्ट होईल. कर्जाचा भार कमी होईल आणि लक्ष्मीची कृपा कायम राहील.
नरक चतुर्दशीला करण्याची शुभ कामे
दिवा लावणे
नरक चतुर्दशीच्या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. हा दिवा यमराजांना समर्पित केला जातो असं केल्याने अकाल मृत्यूची भिती दूर होते आणि आयुष्यातील आर्थिक संकटांवर मात करता येते.
तुळशीची पूजा करणे
नरक चतुर्दशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे देखील शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि धन वाढण्याचा मार्ग मोकळा होतो.
११ कौड्यांचा वापर
जर तुम्ही दीर्घकाळापासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलात, तर छोटी दिवाळीच्या रात्री लक्ष्मीमातेच्या समोर ११ कौड्या ठेवून ‘ॐ ह्रीं श्रीं क्लीं नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करा. दुसऱ्या दिवशी त्या कौड्या तिजोरीत ठेवा. हा उपाय कर्जमुक्ती आणि आर्थिक स्थैर्य देणारा मानला जातो.
चांदीचा नाणे
त्याचप्रमाणे, या दिवशी चांदीचा नाणे किंवा गोमती चक्र लक्ष्मीमातेच्या चरणी अर्पण करा आणि नंतर ते पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. असे केल्याने अचानक होणारे खर्च थांबतात आणि पैशांचा प्रवाह वाढतो. हा उपाय विशेषतः व्यापाऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरतो.
स्वच्छता ठेवा
छोटी दिवाळीच्या दिवशी घराची संपूर्ण साफसफाई करून प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावा. हा देखील एक महत्त्वाचा उपाय आहे. असा विश्वास आहे की ज्या घरात अंधार राहत नाही, तेथे कर्ज, संकट आणि दारिद्रय टिकत नाही. दीपदान करताना भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेची प्रार्थना केल्यास आर्थिक अडथळे दूर होऊन समृद्धी कायमस्वरूपी वसते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
२०२५ मध्ये नरक चतुर्दशी कधी आहे?
नरक चतुर्दशीचा सण १९ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे.
२०२५ मध्येला कोणते उपाय केल्याने कर्ज कमी होते?
लक्ष्मीमातेच्या समोर ११ कौड्या ठेवून ‘ॐ ह्रीं श्रीं क्लीं नमः’ मंत्राचा १०८ वेळा जप करावा आणि त्या कौड्या तिजोरीत ठेवाव्यात.
दिवा कोणत्या दिशेला लावावा?
घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावावा. यमदीपदान अत्यंत शुभ मानले जाते.
गोमती चक्र किंवा चांदीचे नाणे का अर्पण करतात?
हे उपाय केल्याने अचानक होणारे खर्च थांबतात आणि पैशांचा प्रवाह वाढतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.