WhatsApp News, Do Not Click On These 4 WhatsApp Message Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp वर येणाऱ्या या ४ मेसेजवर चुकूनही करु नका क्लिक, बँक खाते होईल रिकामे!

Do Not Click On These 4 WhatsApp Message : सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. जर तुम्हालाही व्हॉट्सअ‍ॅपवर या ४ प्रकारचे मेसेज आले असतील तर चुकूनही त्यावर क्लिक करु नका.

कोमल दामुद्रे

Cyber Crime :

मेटाचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपचा जगभरात कोट्यवधी लोक वापर करतात. ज्यामुळे आपल्याला अनेक लोकांशी कनेक्ट होता येते. व्हॉट्सअ‍ॅपचे जाळे जगभरात असंख्य ठिकाणी पसरले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या ग्राहकांसाठी नवीन अपडेट आणत असते. पण त्यातच अनेक असे मेसेज येतात जे फॉरवर्ड केलेले असतात किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून आपल्याला आलेले असतात. ज्यामुळे स्कॅमर (Scam) लोकांची फसवणूक करुन फोन हॅक करु शकता. सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. जर तुम्हालाही व्हॉट्सअ‍ॅपवर या ४ प्रकारचे मेसेज आले असतील तर चुकूनही त्यावर क्लिक करु नका.

1. जॉब ऑफर

नोकरीच्या नावाखाली अनेक तरुण सायबर गुन्हेगारीला बळी पडू शकतो. तरुणांना चांगली नोकरी देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लिंक पाठवली जाते. आपण लिंकवर क्लिक करताच आपली वैयक्तिक माहिती हॅक (Hacked) केली जाते. ज्यामध्ये आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्डविषयीची माहिती त्यांना सहज मिळते. त्यासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका.

2. लॉटरी

व्हॉट्सअ‍ॅपवर लॉटरी आणि बक्षिसांच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली जात आहे. सायबर गुन्हेगार लॉटरी आणि बक्षिसांच्या माध्यमातून आपल्याला लिंक क्लिक करायला सांगतात. यासाठी ते आपल्या बँकेची वैयक्तिक माहिती विचारुन खाते हॅक करु शकता.

3. बँक अलर्ट (केवायसी अपडेट)

हल्ली अनेक बँका व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटद्वारे वापरकर्त्यांशी कनेक्ट होतात. केवायसी माहिती अपडेट करण्यासाठी हॅकर्स बँक खातेधारकांना लिंक पाठवतात. या लिंकवर केवायसी अपडेट करताच हॅकर्स तुमचा फोन हॅक करु शकतो.

4. Delivery fail

हल्ली आपण ऑनलाइन माध्यमातून अनेक गोष्टी मागवतो. ज्यामध्ये हॅकर्स लोकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रोडक्ट डिलिव्हरी अयशस्वी झाल्याबद्दल सूचना पाठवतात. याच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती हॅक करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT