Manasvi Choudhary
तुम्हाला पण माहितीच असेल पुरूषांना दाढी- मिशी येते पण महिलांना येत नाही. तुमच्यापैकी अनेकांना असा प्रश्न पडतो की महिलांना दाढी- मिशी का येत नसेल? तर याविषयी जाणून घ्या.
महिला व पुरूषांच्या शरीर रचनेमध्ये अनेक घटक आणि रचनांचा समावेश असतो. मानवी शरीराची वाढ ही किशोरावस्थेत होते साधारण ११ ते १३ वर्षामध्ये मानवांमध्ये लैगिंक ग्रथी विकसित होतात.
किशोरावस्थेत पुरूषांच्या लैंगिक ग्रथी अँड्रोजेन हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे पुरूषांच्या चेहऱ्यावर दाढी व मिशी येते.
तर महिलांच्या लैंगिक ग्रंथी अँड्रोजेनऐवजी इस्ट्रोजेन हार्मोन्स तयार करतात. या हार्मोन्सचा दाढी- मिशीशी संबंध नसतो. यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर दाढी - मिशी येत नाही. इस्ट्रोजेन हार्मोनमुळे मुलींच्या शरीरातही बदल होतात.
अँड्रोजेन हार्मोन्समुळे मुलांच्या शरीरामध्ये दाढी- मिशीसोबत मुलांचा आवाज फुटतो. तसेच या हार्मोन्समुळे मुलांच्या शरीरात विविध ठिकाणी केस देखील वाढतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.