Manasvi Choudhary
नेहमीच एकच स्टाईल गवारची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एक सोपी रेसिपी आज आम्ही तुम्हाला या वेबस्टोरीमध्ये सांगणार आहोत.
गवारची शेंगदाण्याच्या कूट घालून केलेली भाजी चवीला स्वादिष्ट लागते. भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
ग्रामीण भागात शेंगदाणा कूट घालून केलेली भाजी लोक आवडीने खातात. तर शहरी भागाच गवारीची भाजी रस्सा बनवून देखील खातात. विविध ठिकाणी गवारची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
गवारची भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिजे गवार स्वच्छ घुवून ती बारीक तोडून घ्या. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये लसूण पाकळ्या, बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला आणि चांगली परतून घ्या.
यानंतर यामध्ये बारीक चिरलेली गवार घाला आणि वरतून शेंगदाण्याचं कूट मिक्स करा. संपूर्ण मिश्रणात मीठ आणि कोथिंबीर देखील तुम्ही चवीसाठी घाला आणि भाजी चांगली शिजवून द्या.
अशाप्रकार सर्व्हसाठी गवारीची चमचमीत भाजी तयार होईल. लहानमुले देखील ही भाजी आवडीने खातील