Besan Barfi Recipe in Marathi Besan Barfi Recipe in Marathi - Saam Tv
लाईफस्टाईल

Besan Burfi For Diwali: दिवाळीत घरच्या घरी बनवा स्वादिष्ट बेसन बर्फी, पाहा रेसिपी

Diwali Special Besan Barfi Recipe : बेसनची बर्फी अतिशय सोपी आणि स्वादिष्ट आहे. हे गोड बर्फी तुम्हीही घरी बनवू शकता.

Shraddha Thik

Besan Barfi Recipe :

दिवाळीला सर्वाधिक भेसळयुक्त मिठाईचा बाजार सक्रिय होतो. माव्यापासून मिठाईपर्यंत सर्वच वस्तू भेसळयुक्त बनवल्या जातात. अशा स्थितीत अनेकजण एकतर घरी बनवलेली मिठाई (Sweets) खातात किंवा मिठाई खाणे टाळतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुमची इच्छा असेल तर तुम्ही दिवाळीला (Diwali)  घरच्या घरी अनेक मिठाई बनवू शकता. बेसनची बर्फी अतिशय सोपी आणि स्वादिष्ट आहे. हे गोड बर्फी तुम्हीही घरी बनवू शकता. बेसन बर्फीची चव अशी असेल की घरी (Home) येणारे पाहुणे तुम्हाला त्याची रेसिपी विचारतील. चला जाणून घेऊया बेसन बर्फी कशी बनवायची?

बेसन बर्फी बनवण्याचे साहित्य

  • 1 वाटी- बेसन

  • 1 वाटी- साखर

  • 1 वाटी- देशी तूप

  • अर्धी वाटी- मावा

  • 4 चमचे- दूध

  • 1 टीस्पून- वेलची पावडर

  • काही बारिक केलेले ड्रायफ्रुट्स

बेसन बर्फी बनवण्याची कृती

  • स्वादिष्ट बेसन बर्फी बनवण्यासाठी प्रथम बेसन एका भांड्यात जाडसर गाळून घ्या.

  • आता दूध आणि 2 चमचे देशी तूप एकत्र करून बेसन पसरून मिक्स करा.

  • आता बेसनाचे मिश्रण हाताने चांगले मिक्स करून घ्या.

  • बेसनमध्ये दिसणारे गुठळ्या जाईपर्यंत तुम्हाला ते मिसळावे लागेल.

  • आता कढईत तूप टाका आणि तूप गरम करून झाल्यावर बेसन घाला.

  • बेसन मंद आचेवर हलके गुलाबी किंवा सुवासिक होईपर्यंत भाजून घ्या.

  • भाजल्यानंतर बेसनाचा रंग बदलला त्यात मावा घाला.

  • गॅस बंद करा आणि पॅनमध्ये बेसन थोडं थंड होऊ द्या.

  • आता एका पातेल्यात अर्धी वाटी पाणी आणि साखर घालून पाक बनवण्यासाठी बाजूला ठेवा.

  • पाकात वेलची पूड मिसळा आणि घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.

  • आता हळूहळू पाक घाला आणि मिश्रण चांगले मिसळा.

  • जेव्हा तुम्हाला वाटेल की मिश्रण घट्ट होण्यार आहे, तेव्हा गॅस बंद करा.

  • एका ट्रेमध्ये थोडं तूप लावून संपूर्ण मिश्रण थोडं घट्टसर पसरवा.

  • वरून बारिक केलेले काजू आणि बदाम टाका आणि थंड होण्यासाठी सोडा.

  • थोडं थंड झाल्यावर बर्फीच्या आकारात कापून पाहुण्यांना सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Maharashtra Live News Update: मनमाड-येवला मार्गावरील अंकाई शिवारात टँकरची रिक्षाला धडक, 6 जण जखमी

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT