Rava Ladoo Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Rava Ladoo Recipe : रव्याचा लाडू वळवताना फुटतो, प्रमाणही चुकते; परफेक्ट कृती पाहाच, झटपट बनतील

How To Make Perfect Rava Ladoo : कमी साहित्यात झटपट रवा लाडू बनवायचे असतील तर या पद्धतीने नक्की ट्राय करुन पाहा

कोमल दामुद्रे

Diwali Special Recipe :

दिवाळी म्हटलं की, या सणात फराळाचा आस्वाद हमखास चाखला जातो. शंकरपाळी, चकलीसोबत लाडू देखील चवीचवीने खाल्ला जातो. या सणात महिला रव्याचे लाडू हौशीने बनवतात.

लाडूचे देखील अनेक प्रकार आहेत. परंतु दिवाळीला बेसन किंवा रव्याच्या लाडवाचा गंध घराघरातून दरवळतो. प्रमाण चुकले की, लाडू बिघडतो. पण व्यवस्थितरित्या प्रमाण घेतले की, रव्याचा लाडू चुकतो. कमी साहित्यात झटपट आपल्याला लाडू बनवायचे असतील तर या पद्धतीने नक्की ट्राय करुन पाहा ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. साहित्य | Ingredients

  • बारीक रवा २ कप | Fine Semolina 2 cup

  • साजूक तूप ½ कप | Ghee ½ cup

  • दुध ½ कप | Milk ½ cup

  • पिठी साखर २ कप | Sugar Powder 2 cup

  • वेलची पूड ½ चमचा | Cardamon Powder ½ tsp

  • पिस्ते सजावटीसाठी | Pistachios

  • बेदाणे सजावटीसाठी | Raisins for garnishing

कृती

  • सर्वप्रथम कढईत चमचाभर तूप घेऊन रवा चांगल्या प्रकारे भाजून घ्या.

  • तूप कमी पडल्यानंतर त्यात वरुन पुन्हा तूप घाला.

  • रवा चांगला भाजल्यानंतर आणि लालसर झाल्यावर त्यात हळूहळू दूध घाला.

  • रव्याला पुन्हा चांगल्याप्रकारे परतवून घ्या. नंतर त्यात पिठीसाखर घालून चांगले मिक्स करुन घ्या.

  • मिश्रण भुरभुरीत वाटत असेल तर त्यात पुन्हा तूप, वेलची पावडर पुन्हा एकजीव करा.

  • त्यानंतर हळूहळू रव्याचा लाडू वळवा. वरुन बेदाणे लावून सर्व्ह करा रव्याचा टेस्टी आणि चविष्ट लाडू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT