Street Shopping Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali 2023 : बजेटमध्ये करा दिवाळीची खरेदी, Street Shopping साठी मुंबईतील बेस्ट मार्केट

Diwali Street Shopping : तुम्हीही दिवाळीची शॉपिंग अजून सुरू केली नाही? तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Shraddha Thik

Diwali Shopping :

तुम्हीही दिवाळीची शॉपिंग अजून सुरू केली नाही? तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. दिवाळी हा सण दिव्यांनी प्रज्वलीत करण्याचा मानला जातो. हा सण जसजसा जवळ येत आहे, तसतसे तुमच्या घरात साफसफाई बरोबरच घराच्या (Home) सजावटीचे सामान आणण्याची लगबग सुरू असेलच ना? मुंबईतील या बाजारांमध्ये लाईट्स, पणत्या, रंगेबीरंगी कंदिल आणि दिवे घेण्यासाठी गर्दी दिसू लागली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईतील या बाजारांमध्ये (Market) सर्वाधिक चांगले सजावटिचे सामान मिळते ज्याच्या मदतीने तुमच्या घराला तुम्ही युनिक मार्गांनी सजवू शकता. चला तर मग पाहूयात ते बाजार कोणते -

दादर मार्केट

सणासुदीच्या काळातच नव्हे तर इतर दिवशीही या बाजारात वर्दळ पाहायला मिळते. सणांच्या काळात दादर मार्केटच्या परिसरात लखलखते दिवे तसेच रोशनाई आणि गजबजलेल्या रस्त्यांवर झेंडूच्या माळा लावलेल्या दिसतात. तेथील हे दृश्य पाहून अनेक लोक घरातील सजावटीसाठी बऱ्याच गोष्टी घेण्यासाठी येतात. मार्केटमध्ये मातीच्या दिव्यांचे स्टॉल, फुलांच्या माळा, दिवाळीच्या (Diwali) शुभेच्छांचे आणि शुभ-लाभ, लक्ष्मी पावलांचे स्टिकर्स पाहायला मिळतात, रांगोळ्या, कंदील, तोरण, चमकदार डिस्को बॉलच्या आकारात इलेक्ट्रॉनिक दिवे विकणारी दुकाने असतात.

भुलेश्वर मार्केट

सणासुदीला सर्वसाधारणपणे आपण नातेवाईकांना किंवा शेजाऱ्यांना भेटवस्तू देतो. तसेच यंदा भेटवस्तूमध्ये काजू, बदाम, पिस्ता अशा सुकामेवाचा समावेश करा. भुलेश्वर या मार्केटमध्ये तुम्ही बदाम, काजू, पिस्ता, मणुके यांसारख्या सुक्या मेव्याचे दुकानं पाहू शकता. पारंपारीक पद्धतीने लोकांना भेटवस्तू देण्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. याशिवाय येथे दिवाळी सणाला फराळां खाद्यपदार्थांचे स्टॉलही लागतात. याव्यतिरिक्त मार्केटमध्ये दागिने आणि कपड्यांची खरेदीही करता येईल.

माटुंगा मार्केट

तुम्ही लोहार चाळच्या उल्लेखाशिवाय दिवाळीच्या दिव्यांबद्दल बोलूच शकत नाही. येथे तुम्हाला फॅन्सी फिक्स्चरपासून ते असंख्य रंगांमध्ये एलईडी लाईट्स स्ट्रिप्सपर्यंत विविध पर्याय मिळतील. येथे खरेदी करण्याचे दोन फायदे आहेत, तुम्हाला तुमच्या बजेटपेमध्ये मिळणाऱ्या वस्तूंसह आणखी इतर वस्तू खरेदी करता येतील.

क्रॉफर्ड मार्केट

दादर आणि भुलेश्वर मार्केटपेक्षा जास्त वर्दळ या मार्केटला असते परंतू या मार्केट मध्ये नव्या प्रकारचे लाईट्स, भव्य फेयरी लाइट्स आणि मिर्ची लाइट्स म्हणून प्रसिद्ध असलेले पातळ बल्ब विकतात. विविध रंगांमध्ये उपलब्ध असलेले बजेटफ्रेंडली लाईट्स विकत घेता येतील. तुम्ही या बारिक लाईट् तुम्ही काचेच्या बाटल्यांमध्ये किंवा जारमध्ये टाकून तुमच्या घराची सजावट करू शकता. हे मार्केट लाईटिंगसह इतरही वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT