Diwali 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali 2023 : दिवाळीला पिठाचे दिवे का लावले जातात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Diwali Deep Importance : दिवाळीचे महत्त्व वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की या दिवशी प्रभू श्री राम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते.

Shraddha Thik

Deep Importance :

हिंदू धर्मात दिवाळीला खूप महत्त्व आहे. या सणाला दिव्यांचा सण असेही म्हणतात. हा आनंदोत्सव सुमारे पाच दिवस चालतो. दिवाळी हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की या दिवशी प्रभू राम आपला 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले.

ज्याचा आनंद साजरा करण्यासाठी अयोध्येतील लोकांनी तुपाचे दिवे लावले. दिवाळी (Diwali) अगदी जवळ आली असताना, या सणाबद्दल बरेच काही जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया दिवाळीला पिठाचे दिवे का लावले जातात?  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पिठाचा दिवा

दिवाळीच्या दिवशी पिठाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी यमदेवाची पूजा (Diwali) करण्याची परंपरा आहे. यमासाठी पिठाचा दिवा लावल्यास नरकापासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे.

तसेच भगवान यमाची नजर तुमच्या कुटुंबावर कधीही पडत नाही. अशा वेळी प्रत्येकाने आपल्या घरात (Home) हा दिवा लावलाच पाहिजे. हा दिवा लावल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरवा. यानंतर दक्षिण दिशेला ठेवा. कारण ही दिशा यमदेवाची मानली जाते.

जाणून घ्या कोणत्या समस्येवर कोणता पिठाचा दिवा लावावा.
गव्हाच्या पिठाचा दिवा :
जर तुम्ही एखाद्या वादात अडकले असाल आणि त्यातून सुटका हवी असेल तर गव्हाच्या पिठाचा दिवा लावणे उत्तम मानले जाते.

उडीद पिठाचा दिवा :
शत्रूला हरवून विजय मिळवायचा असेल तर उडदाच्या पिठाचा दिवा उपयोगी पडू शकतो.

मूगाच्या पिठाचा दिवा:
ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या घरात शांती हवी असेल तर मूगाच्या पिठाचा दिवा लावा.

दिवाळीचे महत्व

दिवाळी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. दिवाळीला अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीकही मानले जाते. दिव्यांचा हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या शुभ दिवशी धनाच्या देवीची पूजा मोठ्या भक्ती आणि समर्पणाने केली जाते.

तसेच धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि आपल्या भक्तांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते त्यामुळे सगळीकडे उज्वल केले जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT