Chocolate Pista Barfi Recipe For Diwali Diwali Special Mithai - Chocolate Pista Barfi Recipe
लाईफस्टाईल

Pista Chocolate Barfi: दिवाळीसाठी घरच्या घरी झटपट बनवा पिस्ता चॉकलेट बर्फी; पाहा रेसिपी

Diwali Special Mithai Recipe: दिवाळीला घरच्या घरी पिस्ता चॉकलेट बर्फी बनवा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diwali Special Mithai Recipe: पिस्ता चॉकलेट बर्फी

दिवाळी म्हटल्यावर अनेक पदार्थ घराघरात केले जातात. त्यात गोडाचे पदार्थ प्रामुख्याने बनवले जातात. काही दिवसातच दिवाळीला सुरूवात होणार आहे. दिवाळीच्या फराळाची सुरुवात घराघरात सुरू झाली आहे. दिवाळीत आपण घरी आलेल्या पाहुण्यांना गोडाचे पदार्थ देतो.

दिवाळीत आपण फराळ बनवतो. परंतु त्याशिवाय अनेक पदार्थ तुम्ही नातेवाईकांना, मित्रमंडळीना देऊ शकतात. त्यातील एक पदार्थ म्हणजे बर्फी. अनेकदा आपण बाहेरुन विकत आणून बर्फी खाऊ घालतो. मात्र, तुम्ही घरच्या घरी झटपट बर्फी बनवू शकता. त्यात चॉकलेटची बर्फी असेल तर अजूनच मज्जा येते. लहान मुलांना तर चॉकलेटची बर्फी खूप जास्त आवडते. घरच्या घरी झटपट अशी चॉकलेट पिस्ता बर्फी बनवू शकता. त्याचीच रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

साहित्य

  • पिस्त्याची पावडर

  • कोको पावडर

  • दीड वाटी खवा

  • 1/4 वाटी पीठी साखर

  • रोझ इसेन्स

  • तूप

  • खायचा हिरवा रंग

रेसिपी

  • सर्वप्रथम एका नॉनस्टिक पातेल्यात खवा आणि पिठीसाखर घाला. १५ मिनिटे हे मिश्रण सतत हलवत राहा.

  • हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे दोन भाग करा.

  • खव्याच्या एका भागात पिस्त्याची पावडर, वेलची पूड, रोझ इसेन्स आणि खायचा हिरवा रंग एकत्रित मिसळून घ्या.

  • उरलेल्या खव्याच्या मिश्रणात कोको पावडर घाला. त्यानंतर एका प्लॅस्टिक शीटवर थोड तूप लावून घ्या.

  • पिस्त्याचे मिश्रण या प्लॅस्टिक शीटवर पसरुन घ्या. त्याला हाताचा वापर करुन आयताकृती पसरुन घ्या. त्यानंतर एका बाजूला कोको पावडरपासून बनलेले खव्याचे मिश्रण काढा. त्याचे लांब आकाराचे गोळे करुन घ्या.

  • त्यानंतर हे मिश्रणाचे गोळे पिसत्याच्या मिश्रणावर ठेवा. त्यानंतर हे दोन्ही मिश्रण प्लॅस्टिक शीटत्या साहाय्याने रोल करुन घ्या.

  • या तयार झालेल्या मिश्रणाचे रोल सुरीने कापून घ्या. क्यानंतर १५ मिनिटे फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर सजावटीसाठी बर्फीवर चांदीचा वर्क लावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT