Diwali 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali 2023: दिवाळीला गावी जाताय? घराबाहेर पडताना 'या' गोष्टी नक्की चेक करा

Diwali: दिवाळीत गावी जाताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diwali Safety:

दिवाळीच्या सुट्ट्यांना सुरुवात झाली आहे. अनेक लोक घराबाहेर पडताना दिसत आहे. दिवाळीसाठी काहीजण गावी जातात. लाँग वीकेंडच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जातात. त्यावेळी घराबाहेर पडताना सुरक्षिततेची खबरदारी घ्या. वाढत्या चोरींच्या प्रकरणांमुळे खूप काळजी घ्यावी.

दिवाळी धुमधडाक्यात साजरी करताना अनेकदा आपण काळजी घेत नाही. शहरात दिवसेंदिवस गुन्हे वाढताना दिसत आहेत. त्यामुळे जास्त दिवस घर बंद असल्याचे पाहून चोरटे डाव साधतात. त्यामुळे सुरक्षिततेची काळजी घेऊनच घराबाहेर पडा. अनेकदा रुप बदलून चोर घरात घुसतात. त्यामुळे काळजी घ्या.

बाहेर जाताना शेजाऱ्यांना सांगून जा. घराला लॉक करा. घरातील अनेक मौल्यवान वस्तू, पैसे, सोने-चांदीचे दागिने चोरीला जाऊ शकतात. त्याकडे विशेष लक्ष द्या. गावी जाण्यापूर्वी मौल्यवान वस्तू, रोख रक्कम सुरक्षित बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा.

घरात जास्त रोख रक्कम ठेवू नये. जास्त दिवसांसाठी गावी जाणार असाल तर शेजाऱ्याना सांगावे. त्यांच्याकडे घराची चावी द्यावी. घराचे दार-खिडक्या बंद आहेत याची खात्री करावी. कार आणि दुचाकी सुरक्षितपणे अंगणात किंवा पार्किंगमध्ये पार्क करावी. बाईकचे हँडल लॉक करावे.

गावी जाण्याआधी शक्य असल्यास सीसीटीव्ही आणि अलार्म यंत्र लावावे. जेणेकरुन जर कोणी घरात यायचा प्रयत्न केला तर अलार्म वाजेल. शक्य असल्यास घरी रात्री झोपण्यासाठी विश्वासू व्यक्तीला सांगावे. त्याचबरोबर घराला दोन लॉक लावावे. घराला सेफ्टी डोअर बसवणेदेखील महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT