Diwali 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali 2023 :धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही करु नका या गोष्टी, अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dhanteras 2023:

दिवाळीला सुरूवात झाली आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. यावर्षी 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी साजरी केली जाते. दिवाळीच्या दोन दिवस आधी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी घरात लक्ष्मी नांदते असे म्हणतात. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी किंवा घरातील कोणत्याही सदस्याचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या.

घरात पैशाची कमतरता भासू नये यासाठी धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी करतात. या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करतात तशाच काही गोष्टी करायच्या नसतात. त्या गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

धारदार वस्तू

धनत्रयोदशीच्या दिवशी धारदार वस्तू घेणे टाळावे. चाकू, कात्री या गोष्टी घेऊ नये. या गोष्टी घेणे खरेदी करणे घरासाठी अशुभ असते असं म्हणतात.

स्टील

धनत्रयोदशीच्या दिवशी अनेकजण स्टीलची भांडी खरेदी करतात. परंतु या दिवशी ही भांडी खरेदी करु नये असा सल्ला दिला जातो. स्टीलऐवजी तुम्ही तांबे किंवा कांस्य अशा वस्तू खरेदी करु शकता.

लोखंड

धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू घेऊ नये. लोखंडी वस्तू घेणे अशुभ मानले जाते. त्यामुळे संपत्तीचा देव मानणारा कुबेर देव रागावतो असे म्हणतात.

काचेची भांडी

धनत्रयोदशीच्या दिवशी काचेची भांडी खरेदी करणे अशुभ मानले जाते. काचेच्या वस्ती राहुशी संबंधित असतात असे म्हणतात.

अॅल्युमिनियम आणि प्लॅस्टिक प्रोडक्ट्स

धनत्रयोदशीच्या दिवशी अॅल्युमिनियम आणि प्लॅस्टिकच्या वस्तू घेणे टाळावे. त्याशिवाय धातूपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करा.

रिकामे भांडे

धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारातून खरेदी केलेली वस्तू रिकामी आणू नये. त्यात कोणत्याही प्रकारचे धान्य टाकून ती वस्तू घरात आणावी. जेणेकरुन घराची भरभराट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT