Chanakya Niti Quotes: आयुष्यात प्रगती करण्यासाठी चाणक्याच्या 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा

Chanakya Niti On Life: आयुष्यात प्रगती करण्यासाठी नेहमी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत.
Chanakya Niti
Chanakya NitiSaam Tv
Published On

Chanakya Niti:

आयुष्यात प्रगती करण्यासाठी नेहमी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपले कौशल्य आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर आपण खूप प्रगती करु शकतो असं चाणक्य म्हणतात. चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचा सल्ला ऐकून आपण आयुष्यात खूप प्रगती करु शकतो.

चाणक्या नेहमी चांगल्या गोष्टी करण्यास सांगतात. त्यांनी आयुष्यात नेहमी चांगल्या मार्गावर चालण्यास सांगितले आहे. ते नेहमी योग्य गोष्टी करण्यास सांगतात.

चाणाक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

मूर्ख व्यक्तींशी कधीच वाद घालू नये. त्यांच्यापासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी वाद घालून आपण आपलाच वेळ वाया घालवतो.

चाणक्य नेहमीच सांगतात की, ऋण, शत्रू आणि राग या गोष्टींना कधीच कमी लेखू नका. या तीन गोष्टी वेळीच सोडल्या पाहिजेत. ते प्रगतीसाठी चांगले असते.

चाणक्य म्हणतात, कठीण प्रसंगात तुम्ही ठाम राहायला हवे. तुमचे ध्येय चांगले असेल तर तुमच्या सर्व गोष्टी चांगल्या होतात. तसेच ध्येयावर ठाम राहिल्यास नशीबदेखील तुमची साथ देईल.

Chanakya Niti
Vasubaras Wishes 2023 : दिवाळीचा पहिला सण वसुबारस, प्रियजनांना पाठवा Facebook, WhatsApp च्या माध्यामातून शुभेच्छा!

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर तुमचे मत मांडत असाल आणि ती व्यक्ती तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नसेल तर तिच्यावर विश्वास ठेवू नये. ते लोक तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतात.

माणसांनी नेहमी चुकांमधून शिकले पाहिजे. नेहमी स्वतः नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा.

चाणक्य म्हणतात, नेहमी नशीबावर अवलंबून राहणे योग्य नाही. यामुळे तुमच्या बुद्धीचा ऱ्हास व्हायला सुरूवात होईल.

कोणतीही व्यक्ती आपल्या पदामुळे मोठी नसते. ती व्यक्ती त्यांच्या कलागुणांमुळे मोठी असते. त्यामुळे कधीच स्वतः ला इतरांपेक्षा मोठे मानू नये.

जिथे लोक तुमचा आदर करत नाही. तिथे माणूस राहू शकत नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला इज्जत देत नाही तिथे कधीच राहू नये.

Chanakya Niti
Tata Motors: देशातील बाजारपेठेत सीएनजी कारचा दबदबा, ईव्‍ही क्रांतीदरम्‍यान टाटा मोटर्सने केला महत्वाच्या धोरणाचा अवलंब

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com