Eye care tips in Marathi, Health care Tips in Marathi
Eye care tips in Marathi, Health care Tips in Marathi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Eye Care : पापण्यांना लागत असणाऱ्या खाजेबद्दल अपाय आणि उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शरीर सुदृढ असेल तर आपले आरोग्यही चांगले असते. परंतु, शरीरसोबत त्याच्या इतर अनेक अवयवांची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या शरीराचा सुंदर अवयव म्हणजे अर्थात डोळे. डोळ्यांमुळे आपण जग पाहू शकतो पण त्या डोळ्यांची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. जितके सुंदर डोळे (Eye) असतात तितक्याच सुंदर आणि दाट अशा त्यांच्या पापण्या. अनेक कॉस्मेटिक वापरून आपण डोळ्यांना अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी डोळ्यांची काळजी घेऊनही पापण्यांना ऍलर्जी होते, खाज लागते. त्यामुळे डोळ्यांची काळजी (Care) घेण्यासोबतच पापण्यांचीही विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. डोळे आणि पापण्यांच्या काळजीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया. (Eye care tips in Marathi)

हे देखील पहा -

पापण्यांना खाज येत असेल तर काय करावे

१. पापण्यांना वारंवार खाज येत असेल तर ही डोळ्यांभोवतीची समस्या असल्याचे लक्षण असू शकते. अशा वेळी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होऊ शकतो. पापण्यांवर येणाऱ्या खाजेमुळे डोळे जळजळणे, डोळ्यातून पाणी (Water) येणे डोळे लाल होणे, डोळ्याभोवती किंवा संपूर्ण चेहऱ्यावर सूज येणे. अशी समस्या गंभीर असेल तर कधीकधी आपल्याला अंधुक दिसण्याची समस्या होऊ शकते.

२. पापण्यांना खाज येण्याची अनेक कारणे असू शकतात. व्हायरल इन्फेक्शन्स, सर्दी, डोळे आणि पापण्यांच्या वर सूज येणे, ताप येणे, मेकअप करताना वापरल्या जाणाऱ्या सौंदर्य उत्पादनांना दुष्परिणामांशिवाय अनेक कारणे आहेत. जर तुम्हालाही पापण्या खाज येण्याची समस्या आहे.

३. पापण्यांची खाज कमी करण्यासाठी आपण कोल्ड कॉम्प्रेसरचा वापर करु शकता. तसेच, डोळ्यांवर बर्फ लावून थोड्या वेळाने डोळे थंड पाण्याने धुतल्यास पापण्यांच्या खाजेपासून सुटका मिळू शकते. आपण थंड पाण्यात मऊ कापड भिजवून काही वेळ डोळ्यांवर ठेवू शकतो. पापण्यांना खाज येत असेल तर डोळे वारंवार चोळणे टाळा.

४. एरंडेल तेल असलेले आय ड्रॉप्स देखील पापण्यांच्या खाजेवर वापरले जाऊ शकते. या आय ड्रॉप्सपैकी फक्त एक थेंब डोळ्यांमध्ये टाकावा हे लक्षात ठेवा. हे रात्री झोपण्यापूर्वी केल्यास आराम मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे . पापण्यांची खाज वाढत असेल तर कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : दिल्ली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंह लवली यांचा भाजपमध्ये प्रवेश

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Patra Chawl Scam: संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ', स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

Jalna News | जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक! भाजप कार्यकर्ते आंदोलकांमध्ये झटापट...

Urvashi Rautela: ऋषभ पंतशी लग्न करणार का? चाहत्याचा प्रश्न, दोन शब्दात उत्तर देत उर्वशी रौतेलानं चर्चा केली शांत

SCROLL FOR NEXT