Understanding mental health starts with knowing the right expert – psychologist or psychiatrist. Saam Tv
लाईफस्टाईल

सायकोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट यात नेमका फरक काय? तुम्हाला माहीत आहे का? वाचा

Difference Between Psychologist And Psychiatrist: जागतिक आरोग्य दिनानिमित्त क्लिनिकल सायको-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. कविता गडदे यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि सायकोलॉजिस्टची बदलती भूमिका यावर प्रकाश टाकला आहे.

Omkar Sonawane

आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक सुदृढता नव्हे, तर तो संपूर्ण आरोग्याचा पाया आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव, चिंता आणि भावनिक संघर्षांचे प्रमाण वाढत असताना, मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते, असे प्रतिपादन क्लिनिकल सायको-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. कविता गडदे यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त केले आहे.

बदलत्या काळानुसार 'फॅमिली फिजिशियन'प्रमाणेच आता 'सायकोलॉजिस्ट'ची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे डॉ. गडदे यांनी नमूद केले. पूर्वी घरातील वैद्यकीय समस्यांसाठी फॅमिली फिजिशियनवर विश्वास ठेवला जात असे, तसाच विश्वास आता मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञ समुपदेशकांवर ठेवणे गरजेचे आहे.

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष का?

समाजात आजही मानसिक आरोग्याबाबत मदत घेताना संकोच वाटतो. लोक काय म्हणतील किंवा आपण वेडे ठरवलो जाऊ या भीतीपोटी अनेकजण नैराश्य आणि चिंता यांसारख्या समस्या अंगावर काढतात. मात्र, योग्य वेळी घेतलेले मार्गदर्शन या समस्यांचे रूपांतर गंभीर आजारात होण्यापासून रोखू शकते असे डॉ. कविता गडदे यांनी स्पष्ट केले.

सायकोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्टमधील फरक

बऱ्याचदा लोकांमध्ये या दोन संज्ञांबाबत संभ्रम असतो. सायकियाट्रिस्ट हे वैद्यकीय डॉक्टर असून ते औषधोपचार करतात, तर सायकोलॉजिस्ट समुपदेशन (Counseling), थेरपी आणि वर्तणुकीतील बदलांवर काम करून व्यक्तीला स्वतःचा मार्ग शोधण्यास मदत करतात.

जागरूकतेची गरज

विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण, कॉर्पोरेट क्षेत्रातील परफॉर्मन्सचा दबाव आणि कौटुंबिक नातेसंबंधांमधील तणाव यांवर मात करण्यासाठी जीवनकौशल्यांचा विकास करणे आवश्यक आहे. भावनिक स्थिरता आणि निर्णयक्षमता हीच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले. मदत घेणं ही कमजोरी नसून ती स्वतःबद्दलची जागरूकता आहे, असा संदेश डॉ. कविता गडदे यांनी यावेळी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अमरावतीत बच्चू कडू समर्थकांचा मोठा जल्लोष

Karisma Kapoor Children: करिश्माच्या मुलांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; सावत्र आईला विकता येणार नाही वडील संजय कपूरची प्रॉपर्टी

उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट| VIDEO

Smallest Railway station: देशातील सर्वात लहान रेल्वे स्टेशन कुठे आहे? तुम्ही गेलात का या ठिकाणी

Riyan Parag Vaping Fine : ड्रेसिंग रूममध्ये 'धूर' काढणाऱ्या रियान परागवर मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT