Diet After Delivery: प्रसुतीनंतर महिलेने आवर्जून खावेत 'हे' पदार्थ Saam Tv news
लाईफस्टाईल

Diet After Delivery: प्रसुतीनंतर महिलेने आवर्जून खावेत 'हे' पदार्थ

प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेच्या शरीरातून भरपूर रक्तस्त्राव होत असतो. यामुळे महिलेचे शरीर आतून खूप अशक्त झालेले असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसूती (delivery) दरम्यान गर्भवती (Pregnancy) महिलेच्या शरीरातून भरपूर रक्तस्त्राव (Bleading) होत असतो. यामुळे महिलेचे शरीर आतून खूप अशक्त होते. अशा अशक्त या शरीराला बरे होण्यासाठी किमान 45 दिवस लागतात. हेच कारण आहे की स्त्रीला प्रसूतीनंतर 40 दिवस घरातील सर्व कामे न करण्याचा सल्ला दिला जातो.

हे देखील पहा-

खरं तर, प्रसूतीनंतर लगेचच महिलांच्या आहाराकडे खूप लक्ष देणे आवश्यक आहे. कारण प्रसूती वेदना सहन केल्यानंतर, महिला बराच काळ त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेत नाही. अशा परिस्थितीत, त्यांच्याबरोबरच्या लोकांनी त्यांच्या आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. जेणेकरुन माता आणि बाळाचे आरोग्य अधिक चांगले राहिल. प्रसूतीनंतर महिलेच्या पहिल्या जेवणात समाविष्ट असलेल्या पदार्थांबद्दल येथे जाणून घ्या.

व्हेजिटेबल सूप (Vegetables Soup)

बाळाच्या जन्माच्या वेळी, स्त्रीच्या शरीरातून भरपूर द्रव बाहेर पडतो, ज्यामुळे तिच्या शरीरात द्रवपदार्थाचा अभाव असतो. अशा स्थितीत भाज्यांचे सूप तिच्या शरीरातील द्रवपदार्थाची कमतरता पूर्ण करते आणि स्त्रीला ऊर्जा देण्याचे काम करते.

खारट बिस्किट (Salty biscuits)

बाळंतपणानंतर, तोंडाची चव औषधे आणि ऍनेस्थेसियामुळे खूप बदलते. अशा परिस्थितीत स्त्रीला नमकीन बिस्किट दिले पाहिजे. यामुळे तोंडाची चव सुधारते. त्याचप्रमाणे बिस्किटामध्ये असलेले कार्बोहायड्रेट ऊर्जा देते आणि मीठ इलेक्ट्रोलाइट संतुलित करण्याचे काम करते.

खारीक-खजूर (Kharik-Khajur)

प्रसूतीनंतर रक्त कमी झाल्यामुळे खूप अशक्तपणा येतो. अशा स्थितीत महिलेने पाण्यात भिजलेल्या कोरड्या खजूर खायला द्याव्यात. यामुळे त्याच्या तोंडाची चव सुधारेल आणि मातेच्या शरीराला पुरेशा प्रमाणात लोह मिळेल.

फळ (fruits)

मुलाच्या जन्मानंतर, बहुतेक स्त्रियांना बद्धकोष्ठतेची समस्या असते, यामुळे त्यांनाही खूप समस्या असतात. यासाठी स्त्रीला फायबर युक्त आहार दिला पाहिजे. स्त्रीने फळे खावीत. फळापासून फायबर स्त्रीच्या शरीरात पोहोचते आणि तिला बद्धकोष्ठतेत आराम मिळतो.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पांड्यासोबत दिसणारी 'ही' अभिनेत्री कोण? 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात साकारली होती खास भूमिका

Maharashtra Live News Update: छठपूजेला सार्वजनिक परवानगी देऊ नये, मराठी एकीकरण समितीची मागणी

Navi Mumbai Metro: वाशीमधून मेट्रो धावणार! मुंबई एअरपोर्ट आणि नवी मुंबई एअरपोर्ट झटक्यात गाठता येणार

Life expectancy with a single kidney: व्यक्ती एका किडनीवर किती जगता येतं? जाणून घ्या काय काळजी घ्यावी लागते?

Hingoli : तहसीलदारांच्या खुर्चीवर फेकले सडलेले सोयाबीन; हिंगोली, सेनगाव तालुके वगळल्याने शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT