Diabetic Patient
Diabetic Patient  Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetic Patient : फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी मधुमेहींनी 'या' पदार्थाचे सेवन करा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diabetic Patient : नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज एक गंभीर आजार आहे. या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे यकृतामध्ये चरबी जमा करणे. हा आजार मधुमेह रुग्णांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. तर त्यासाठी एक चांगली बातमी आहे की नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे.

मधुमेह टाईप 2 रुग्णांमध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर समस्या कॉफीच्या मध्यम सेवन करून या रोगाची तीव्रता कमी करू शकतो. कोलंबिया युनिव्हर्सिटी मधील संशोधकांनी अभ्यास करून न्यूट्रिएंट्स या जर्नलमध्ये पब्लिश केले आहे.

जे लोक (People) अल्कोहोल पित नाही पण त्यांना इतर आजार म्हणजेच थायरॉईड मधुमेह तर कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर लठ्ठपणा यांचा त्रास असेल अशा व्यक्तींना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होतो. या रुग्णांना लिव्हरचा संबंधित आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते. या समस्यांकडे लक्ष दिले नाही तर तुमचे लिव्हर डॅमेज होऊ शकते.

एका वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार मुंबई येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या लिव्हर ट्रान्सप्लांट आणि हे हेपॅटो पॅनिक्र्याटिक सर्जरी या विभागाचे डॉक्टर गौरव गुप्ता यांनी सांगितले की ज्यांना फॅटी लिव्हरचा आजार आहे. त्यांनी आपल्या आहारात कॉफीचा (Coffee) समावेश करावा कॉफीचे सेवन फार कमी प्रमाणात केले पाहिजे त्यामुळे या रोगाचे प्रमाण हळूहळू कमी होईल.

मधुमेहाला नियंत्रित करण्यासाठी कॉफीमधील कोणता घटक मदत करतो?

मधुमेह असणाऱ्या रुग्णांना त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देण्याची गरज असते. त्यांना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. त्यांना काहीही खाण्या अगोदर खूप विचार करावा लागतो. कॉफीचे थोड्या प्रमाणात सेवन करून मधुमेह नियंत्रित करू शकता.

डॅमेज झालेल्या पेशीचे संरक्षण कॉफी मधील मुक्त रॅडिकल्स करू शकते. फ्री रॅडिकल्स मुळे ऑक्सीडेटीव स्ट्रेस होतो त्यामुळे याने सुजन अधिक वाढते त्यामुळे लिव्हरला अधिक जास्ती धोका निर्माण होण्याची शक्यता असते अशा वेळेस कॉफी फ्री रॅडिकल्स होण्यापासून मदत करत असते.

पॉलीफेनोल कॉफीमध्ये असते त्यामुळे यकृतातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास कॉफी फायदेशीर असते. पालेभाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करून तुम्ही या समस्या सहज दूर करू शकता. मल्टीविटामिन, फळे ताज्या हिरव्या भाज्या यांचे नियमित सेवन करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : Raigad Breaking : सांगोल्यात बागलवाडीत EVM मध्ये बिघाड

Rohit Sharma Record: आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरताच रोहित शर्मा रचणार इतिहास! असा रेकॉर्ड करणारा ठरणार पहिलाच खेळाडू

Shinde vs Thackeray : हातकणंगलेत हायव्होल्टेज राडा! शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी

Raver News : केळीला भाव नसल्याने कर्ज फेडीची विवंचना; तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

Anjali Arora : 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोरा साकारणार सीता मातेची भूमिका

SCROLL FOR NEXT