Diabetes VS Silent Heart Attack  Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes VS Silent Heart Attack : मधुमेह आणि सायलेंट हार्ट अटॅकचा धोका किती? लक्षणे कोणती ?जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Heart Attack Reason : मधुमेहामुळे हृदयविकार अथवा हृदयात होणारा त्रास अनेकांना जाणवत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Silent Heart Attack Symptoms :

वाढत्या आरोग्याच्या समस्यांमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मधुमेहींमध्ये बऱ्याचदा हृदयविकार हे कोणत्याही लक्षणांशिवाय आढळून येतात. मधुमेहामुळे अनेकदा हृदयात होणारे बदलही माणसांना कळत नाहीत. इतकंच नाही तर मधुमेहामुळे हृदयविकार अथवा हृदयात होणारा त्रास अनेकांना जाणवत नाही.

नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्सचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. ऋषी भार्गव म्हणतात रक्तातील उच्च साखरेची पातळीने रक्तवाहिन्यांच्या धमनींच्या भिंतींवर प्लेक तयार होतो. परिणामी रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्त पंप करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हृदयाच्या आरोग्याविषयी (Health) जागरुकतेची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मधुमेहींमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढते ज्यामुळे शरीर इंसुलिन तयार करण्यास किंवा त्याचा प्रभावीपणे वापर करण्यास असमर्थ ठरते. मधुमेहाच्या (Diabetes) रूग्णांमध्ये दिसणाऱ्या सामान्य लक्षणांमध्ये तहान लागणे, लघवीचे प्रमाण वाढणे, हातपायांमध्ये मुंग्या येणे किंवा सुन्न पडणे, वजन कमी जास्त होणे, भूक वाढणे, सतत जळजळ होणे आणि सूज येणे, थकवा जाणवणे आणि अंधुक दृष्टी अशा लक्षणांचा समावेश होतो.

सायलेंट हार्ट अटॅकमध्ये (Heart Attack) त्याच्या नावाप्रमाणेच लक्षणे पटकन लक्षात येत नाहीत. ते अधिक हानिकारक ठरु शकतात कारण रूग्णाला सुरुवातीची लक्षणे कळून येत नाहीत.

1. सायलेंट हार्ट अटॅकची कारणे कोणती?

मधुमेह असलेल्या लोकांना हे लक्षात घेणे आवश्यक आहे की सर्वसामान्यांच्या तुलनेने त्यांना हृदयविकाराचा धोका अधिक आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे मधुमेहामुळे मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते, परिणामी हात आणि पाय सुन्न होणे किंवा न्यूरोपॅथी म्हणून ओळखले जाणारी लक्षणे दिसू शकतात.

मात्र, हे नुकसान हृदय, मूत्राशय आणि रक्तवाहिन्यासारख्या महत्त्वाच्या अवयवांना नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतूंवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या स्थितीला कार्डियाक ऑटोनॉमिक डिसफंक्शन किंवा ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी असे म्हणतात. परिणामी, हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान व्यक्तींना कोणतीही वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकत नाही जी सामान्यत: छाती जड होणे, हात किंवा जबड्यासंबंधी वेदना जाणवू शकतात.

मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यासाठी आणि सायलेंट हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी विविध निर्देशकांकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. यामध्ये उभे राहिल्यावर चक्कर येणे किंवा बेशुध्द पडणे, शारीरिक हालचाली दरम्यान अडचणी येणे, लघवीसंबंधी अडचणी, लैंगिक समस्या जसे की लैगिंक इच्छा कमी होणे, जास्त घाम येणे तसेच पचनाच्या समस्या आणि सूज येणे यांचा समावेश होतो. ही लक्षणे वेळीच ओळखून महत्त्वाची पावले उचलता येऊ शकतात.

2. सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे

अनेक लोकांना वाटतं की, हार्ट अटॅक आल्यानंतर छातीत वेदना होतात त्यामुळे हार्ट अटॅक आल्याचे कळते. पण अनेकदा हार्ट अटॅक कोणत्याही लक्षणांशिवायही अचानक येत असतो. रुग्णाला मान, खांदा आणि जबड्यामध्ये वेदना होतात. अचानक खूप घाम येऊ लागतो. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. वेळीच डॉक्टारांचा सल्ला घ्या. लठ्ठपणा, धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन करणे, बैठी जीवनशैली, रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे आणि चयापचय विकारांनी ग्रस्त तसेच मधुमेहींना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.

सायलेंट हार्ट अटॅक ज्याला सायलेंट मायोकार्डियल इन्फेक्शन (SMI) असेही म्हणतात यामध्ये काही आठवडे किंवा महिन्यांनंतर नियमित तपासणी होईपर्यंत दम लागणे, थकवा येणे अशी गंभीर लक्षणे आढळून येईपर्यंत याबाबत माहिती नसते. याचे निदान ईसीजी चाचणी (इकोकार्डियोग्राम) द्वारे केले जाऊ शकते जे हृदयाच्या स्नायूवंर झालेले नुकसान दर्शविते.

याव्यतिरिक्त रक्त चाचणी देखील सायलेंट मायोकार्डियल इन्फेक्शनचे निदान शकते. एकदा सायलेंट मायोकार्डियल इन्फेक्शनच्या निदान झाल्यानंतर, हृदयरोग तज्ज्ञ जोखीम घटकांचे मूल्यांकन करू शकतात आणि मधुमेहाच्या रूग्णांसाठी वैयक्तिक उपचार योजना तयार करतात.

ज्यामध्ये आहार आणि जीवनशैलीत बदल, सक्रिय जीवनशैली आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी करण्यासाठी औषधांचा समावेश असू शकतो. तुम्हाला मधुमेह असल्यास आणि सायलेंट हार्ट अटॅकचे कोणतीही लक्षणे दिसल्यास, त्यांच्याकडे दुर्लक्ष न करणे गरजेचे आहे कारणे ते हृदयाच्या कार्यावर परिणाम करू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

SCROLL FOR NEXT