Diabetes Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes : वाढणाऱ्या शुगर लेवलमुळे टेन्शनमध्ये आहात ? आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

सध्या नियमितप्रमाणे वाढत्या साखरेवर नियंत्रण ठेवणे सोपे नाही.

कोमल दामुद्रे

Diabetes : मधुमेह हा जागतिक स्तरावर ओळखला जाणारा आजार आहे. या आजाराचा विळखा असंख्य लहान मुलं, तरुण मंडळी व वयोवृद्धांना बसला आहे. सध्या नियमितप्रमाणे वाढत्या साखरेवर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. यासाठी आहारावर बारीक लक्ष ठेवावे लागेल. तसेच, दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे.

रक्तातील साखरेचे (Sugar) प्रमाण वाढल्याने हा आजार होतो. यासाठी वाढत्या साखरेला नियंत्रणात ठेवणे हे मधुमेहात अवघड काम आहे. विशेषतः, हिवाळ्यात ते आणखी कठीण होते. जर तुम्ही देखील मधुमेहाचे रुग्ण असाल आणि वाढत्या साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर या 5 गोष्टींचा आहारात नक्की समावेश करा. जाणून घेऊया-

1. मशरूम

Mushrooms

यामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) डी, सेलेनियम, झिंक, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट्स, अँटी-डायबेटिक, अँटी-व्हायरल, अँटी-कॅन्सर आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत. तसेच, मशरूममध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे. ग्लायसेमिक इंडेक्स कार्बोहायड्रेटला ग्लुकोजमध्ये बदलण्यासाठी लागणारा वेळ मोजतो. यासाठी हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

2. फ्लॉवर

cauliflower

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर फ्लॉवर आहारात समावेश करू शकता. त्यात आवश्यक पोषक तत्वे, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात

3. गाजर

Carrot

मधुमेहाचे रुग्ण वाढत्या साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात गाजराचा समावेश करू शकतात. हिवाळ्यात गाजर बाजारात सहज उपलब्ध होतात. गाजरात बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन-ए मुबलक प्रमाणात आढळतात. याच्या वापराने साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

4. मटार

Pea

वाढत्या साखरेवर सहज नियंत्रण ठेवण्यासाठी मटारांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. आवश्यक पोषकतत्वे पोटॅशियम, फायबरसह अनेक आवश्यक पोषक घटक त्यात आढळतात. तसेच ग्लायसेमिक इंडेक्स देखील खूप कमी आहे. यासाठी मटार नक्की खा.

5. बीन्स

Beans

हिवाळ्यात वाढणाऱ्या साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी आहारात बीन्सचा समावेश करणे आवश्यक आहे. त्यात आहारातील फायबर, प्रथिने आणि अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. तसेच ग्लायसेमिक इंडेक्स देखील खूप कमी आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spices Storage Tips: मसाले फ्रिजमध्ये ठेवावेत की बाहेर? जास्त काळ फ्रेश आणि सुगंधी ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या!

Horoscope : दिवाळीआधी या ४ राशींचं नशीब चमकणार? पैशाच्या अडचणी होतील दूर अन् नोकरी-व्यवसायात प्रगतीचे योग

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

diwali shopping in mumbai : मुंबईत दिवाळीची खरेदी करायचीये ? या ठिकाणांना नक्की भेट द्या

निवडणुकीत उमेदवाराने खोटी माहिती दिली? आता मतदार थेट दाखल करू शकतो तक्रार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT