Diabetes Health Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Health: मधुमेह असणाऱ्यांनी रिकाम्या पोटी खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा होईल नुकसान

सध्या बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी तसेच कामाचा ताण यामुळे अगदी लहान वयापासून ते मोठ्यापर्यंत सर्वंच डायबिटीजचा शिकार होऊ लागले आहेत.

Manasvi Choudhary

Do Not Eat These Things On Diabetes: सध्या बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी तसेच कामाचा ताण यामुळे अगदी लहान वयापासून ते मोठ्यापर्यंत सर्वंच डायबिटीजचा (Diabetes) शिकार होऊ लागले आहेत. डायबिटीज शरीरातील हार्मोन्स असंतुलन झाल्याने होतो. यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे अधिक महत्वाचे आहे.

डायबिटीज असणाऱ्या रूग्णांनी त्यांच्या आहाराची (diet) विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.दिवसाची सुरूवात करताना तुम्ही सकाळी काय खाता याचा परिणाम तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर होत असतो.

यामुळे सकाळच्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते.यामुळे सकाळी रिकाम्या पोटी काय खावे? याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.आरोग्य तज्ज्ञांच्यामते, हार्मोनल बदलांमुळे सकाळी शरीरातील साखरेची पातळी अनियंत्रित असते. यामुळे डायबिटीज असणाऱ्यांनी रिकाम्या पोटी फळे, मध आणि बिस्किट हे पदार्थ खाऊ नये.

चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

1) व्हाईट ब्रेडमध्ये उच्च जी आय असते. त्यामुळे डायबिटीज असणाऱ्यांनी चुकूनही व्हाईट ब्रेड खाऊ नये.

2) रिकाम्या पोटी शक्यतो फळांचा रस पिऊ नये. फळांच्या रसामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

3) कॉर्न फ्लेक्स ,मुस्ली यासांरखे पदार्थांमध्ये प्रथिने असतात यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते यामुळे मधुमेह असल्यास सेवन करू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IB Recruitment: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरीची संधी, पगार १,४२,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Period Pain Relief: मासिक पाळीच्या वेळी 'या' ड्रायफ्रूटचे सेवन करा, वेदना होतील कमी

Panchang Today: वाचा आजचे पंचांग 15 जुलै 2025; तिथीनुसार केव्हा आहे शुभ योग? 2 राशींना आज होणार लाभ

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्यावर यवतमाळच्या महागांव पोलिसात गुन्हा दाखल

Methi Tea Benefits: पावसात आरोग्य हवेय चांगलं? मग दररोज प्या मेथी दाण्यांचा चहा

SCROLL FOR NEXT