मधुमेह आणि हृदयाचे आरोग्य यांच्यामधील जवळच्या संबंधाकडे दुर्लक्ष करण्यात येतं. मात्र या दोघांचाही व्यक्तीच्या एकूण आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. रक्तातील साखरेची पातळी वाढते त्यावेळी त्याचा परिणाम फक्त ग्लुकोजपुरता मर्यादित नसतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, याचा हृदयावर तसंच एकूण कार्डिओव्हॅस्क्युलर जोखमीवर परिणाम होऊ शकतो.
एका संशोधनानुसार, असं स्पष्ट झालं आहे की, डायबेटीस असलेल्या रूग्णांना हार्टच्या समस्यांचा होण्याचा धोका दुप्पट असतो. रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने रक्तवाहिन्या आणि हृदयाचे कार्य नियंत्रित करणाऱ्या नसांचं नुकसान होण्याची दाट शक्यता असते. मात्र अशा परिस्थितीत तम्ही डायबेटीजचं व्यवस्थापन करण्यासाठी केलेल्या उपाययोजना कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचा धोका कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात.
अंधेरीतील कोकिलाबेन हॉस्पिटलचे कंसल्टंट केडीएएच डॉ. मनिष हिंदुजा यांनी सांगितलं की, "भारतामद्ये मधुमेहाने ग्रस्त असलेल्या अनेक रूग्णांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या येत आहेत. तरुण व्यक्तींमध्ये यांचं प्रमाण वाढतंय. डायबेटीजचं योग्य व्यवस्थापन केलं नाही तर उच्च रक्तदाब, बॅड कोलेस्ट्रॉल आणि उच्च ट्रायग्लिसराइड्स सारख्या हृदयरोगाच्या जोखीम घटकांमध्ये वाढ होऊ शकते. ग्लुकोजमधील होणारा चढउतार टाळण्यासाठी रूग्णांनी काळजी घेणं गरजेचं आहे. याशिवाय प्रतिबंधात्मक पावलं देखील उचलणं महत्वाचं आहे.
अॅबॉटच्या डायबेटिस डिव्हिजनच्या मेडिकल अफेअर्सचे संचालक डॉ. केनेथ ली यांनी सांगितलं की, “प्रभावी मधुमेह मॅनेजमेंटसाठी ग्लुकोजच्या पातळीचं नियमित निरीक्षण करणं गरजेचं आहे. हे कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) डिवाईसेससारख्या साधनांचा वापर करून करण्यात येऊ शकतं. ज्यामध्ये ग्लुकोज पातळीची माहिती देण्यासाठी बोटांना टोचण्याची आवश्यकता नसते.”
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढववणारे पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा. सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे बटर, लाल मीट आणि फुल-फॅट डेअरी उत्पादनांचा आहारात समावेश करणं टाळावं. पालेभाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिनेयुक्त पदार्थांनी युक्त संतुलित आहाराचे सेवन केल्याने हृदयसंबंधित आजारांना प्रतिबंध होऊ शकतो.
हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. यामध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल पातळी यासारख्या घटकांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. नियमित शारीरिक हालचाली देखील मधुमेहाच मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करण्यास मदत करतात.
सीजीएमसारख्या रिअल-टाइम ट्रॅकिंगमुळे रक्तातील साखरेच्या वाढत्या किंवा कमी पातळीवर लक्ष ठेवण्यास मदत होते. दिवसातून किमान १७ तास इष्टतम ग्लुकोजच्या श्रेणीत (७० - १८० mg/dl) असणं महत्वाचं आहे. सीजीएमसारखी डिवाईसेस कनेक्टेड केअर डिजिटल इकोसिस्टम देखील देतात, जी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी आणि केअरगिव्हर्सशी संपर्कात राहण्यास मदत करेल.
धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांच्या अस्तरांचे नुकसान होऊ शकतं. याशिवाय मद्यपान कमी केलं पाहिजे. कारण ते मधुमेहाच्या औषधांच्या परिणामात व्यत्यय आणू शकतात. रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकते.
तणावात असताना शरीरात तणाव हार्मोन्स तयार होतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि इन्सुलिन प्रतिरोधकता निर्माण करू शकते. यामुळे रक्तदाब वाढू शक्यता आहे. हृदयरोग होण्याची शक्यता वाढते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.