Diabetes Health Tips Saam tv
लाईफस्टाईल

Diabetes रुग्णांनो 2024 च्या सुरुवातीला लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल, राहाल फिट

Diabetes Health Tips : काही लोक मधुमेहाने त्रस्त आहेत तर काही मानसिक तणावामुळे. अशातच जर तुम्ही देखील मधुमेहाचे रुग्ण असाल तर जीवनशैलीत कोणते बदल करायला हवे जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Diabetes Health New Year Resolutions 2024 :

नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वीच आपण अनेक प्लान किंवा संकल्प घेतो. पण आयुष्यात आपण त्यांना किती अमलात आणतो यावर अवलंबून असते. नवीन वर्षात आपण फिटनेस संबंधित अनेक गोष्टी ठरवतो पण या गोष्टींचे पालन करत नाही. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.

२०२३ च्या वर्षात अनेकांना आरोग्याच्या (Health) समस्या जाणवल्या आहेत. काही लोक मधुमेहाने त्रस्त आहेत तर काही मानसिक तणावामुळे. अशातच जर तुम्ही देखील मधुमेहाचे रुग्ण असाल तर जीवनशैलीत कोणते बदल करायला हवे जाणून घेऊया.

मधुमेह (Diabetes) हा असा आजार आहे ज्यावर नियंत्रण ठेवणे शक्य नसते. परंतु, काही गोष्टींची काळजी घेतली तर या आजारावर सहज मात करता येते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, २० ते ७० वर्ष वयोगटातील साधारणत: ८.७ टक्के लोक मधुमेहाच्या आजाराने (Disease) त्रस्त आहेत. यामध्ये वर्षानुवर्ष मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. पण जर येत्या नव्या वर्षात आहारात काही बदल केले तर या आजारावर सहज मात करता येईल. जाणून घेऊया कसे

1. व्यायाम

मधुमेहाचा आजार हा लठ्ठपणा किंवा जास्त वजन यासारख्या परिस्थितीमुळे वाढणारा आजार आहे. लठ्ठपणा आणि जास्त वजन असणाऱ्यांना मधुमेहाचा धोका अधिक प्रमाणात असतो. यासाठी व्यायामाला आपल्या आरोग्याचा भाग बनवा. ज्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहिल आणि हृदयाचे आरोग्य देखील सुरळीत राहिल.

2. ब्रेक घ्या

एकाच जागी जास्त वेळ बसल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जास्त वेळ बसल्याने अनेक आजारांचा धोका उद्भवतो. त्यासाठी एकाच ठिकाणी बसणे टाळा. तुम्ही डेस्क जॉब करत असाल तर कामाच्या दरम्यान लहान-लहान ब्रेक घ्या. तसेच हलके स्ट्रेचिंग करा ज्यामुळे तुमचे रक्ताभिसरण सुधारेल.

3. आहार

कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेची पातळी वाढवते. कारण यातून जास्त प्रमाणात ग्लुकोज मिळते. यासाठी आहारातील कार्बोहायड्रेट्स नियंत्रणात ठेवा. रक्तातील साखरेची पातळी वाढत असेल तर फायबरने समृद्ध असलेले पदार्थ निवडा. ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहिल.

4. पाणी प्या

चयापचयासाठी पाणी अंत्यत आवश्यक आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे पाचन तंत्रावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यासाठी किमान ७ ते ८ ग्लास पाणी प्या.

5. पुरेशी झोप घ्या

झोपेच्या कमतरेतमुळे आपल्या शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढू शकतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे रोज ७ ते ८ तासांची झोप घ्या. झोप पूर्ण न झाल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT