Diabetes control tips Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes control tips : रक्तातातील साखर नियंत्रणात ठेवायची आहे तर, मधुमेहाच्या रुग्णांनी जेवल्यानंतर करा 'हे' काम

भारतामध्ये साधारणपणे मधुमेह या आजारांने ग्रस्त बरेच लोक आहेत.

कोमल दामुद्रे

Diabetes control tips : मधुमेहाचा आजार हा सर्वसामान्य असला तरी तो एकदा झाली की, आपल्याला संपूर्ण आयुष्य खाण्यापिण्याच्या गोष्टीत काही प्रमाणात त्याग करावा लागतो.

भारतामध्ये साधारणपणे मधुमेह (Diabetes) या आजारांने ग्रस्त बरेच लोक आहेत. काही आनुवंशिक आहेत तर काहींना इतर आरोग्याच्या समस्यांमुळे झाला आहे. त्यासाठी आपण खाण्यापिण्याबाबत खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून त्याला जीवनात कोणत्याही प्रकारच्या गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

मधुमेहाच्या रुग्णांना त्याच्या खाण्यापिण्यासोबतच रक्ताची पातळी देखील नियंत्रणात कशाप्रकारे ठेवता येईल याची काळजी (Care) घेणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठी जेवल्यानंतर काही गोष्टी लक्षात ठेवल्यास मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल

१. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी जेवणानंतर लगेच झोपू नये किंवा बसू नये. त्यामुळे आपली रक्ताची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे साखरेची पातळी सामान्य ठेवण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर ५ ते १० मिनिटे चालायला हवे. यामुळे तुमच्या शरीरात चरबी जमा होणार नाही व त्यामुळे लठ्ठपणा वाढणार नाही. अशा स्थितीत तुम्ही केवळ शरीरातील साखर टिकवून ठेवू शकत नाही तर इतर आजारांपासूनही वाचू शकता.

२. रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी दिवसभर फळे, हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. दिवसभर काहीतरी खात राहा. उपाशी राहण्याची चूक कधीही करू नका. त्याच वेळी, अधिकाधिक पाणी प्या, अल्कोहोल सोडा घेऊ नका. कोल्ड्रिंकही पिऊ नका.

३. निरोगी जीवनासाठी शारीरिक क्रियाकलाप खूप महत्वाचे आहेत. याशिवाय कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करू नका, हे रक्तातील साखर वाढवण्याचे मुख्य कारण आहे.

४. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा इन्सुलिन नावाचे हार्मोन बाहेर पडू लागते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि किडनीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अमित शहा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर

Shukra Shani Yuti: 30 वर्षांनंतर शुक्र-शनीची होणार युती; नव्या वर्षात 'या' राशींची होणार चांदीच चांदी

Shah Rukh Khan : शाहरूखच्या जीवावर कोण उठलं? सलमाननंतर किंग खानला धमकी

Maharashtra Politics : 'मुंडे भावडांनी परळीतली जमीन बळकावली'; ऐन निवडणुकीत सांरगी महाजनांचा गंभीर आरोप, VIDEO

Raj Thackeray vs Uddhav Thackeray : हिंदुत्वावरून ठाकरेंमध्ये दिवार, महायुतीसाठी जमीन सुपीक होणार?

SCROLL FOR NEXT