Devuthani Ekadashi 2024 goggle
लाईफस्टाईल

Devuthani Ekadashi 2024 : मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते एकादशीचे खास व्रत; यामागे आहे पौराणिक कथा; वाचा

Devuthani Ekadashi 2024 : आज तुम्हला या बातमीमधून मोक्ष प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या एकादशी व्रताची कथा सांगणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Devuthani Ekadashi 2024 : देवूठनी एकादशीचे महत्त्व इतर एकादशींपेक्षा खूप जास्त आहे. आषाढी एकादशीला योगनिद्रेत गेलेले भगवान विष्णू देवउठी कार्तिकी एकादशीला जागे होतात. आज 12 नोव्हेंबरला देवउठी एकादशीचे व्रत पाळण्यात येत आहे. देव जागे झाल्याने शुभ कार्ये सुरू होतात. असे म्हटले जाते की जी व्यक्ती या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची भक्ती भावाने पूजा करते तीच्या आयुष्यातून सर्व संकटे दूर होतात. यासोबतच व्यक्तीला तीच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांपासूनही आराम मिळतो. देवउठनी एकादशीचे व्रत पाळणाऱ्याला मोक्ष प्राप्त होतो अशीही मान्यता आहे. वर्षातील सर्व एकादशी तिथी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या असल्या तरी देवूठनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. ही एकादशी इतर एकादशीपेक्षा अधिक फलदायी मानली जाते. या एकादशीची व्रत कथा ऐकल्याने किंवा वाचल्यानेही पुण्यप्राप्ती होते. 

देवउठनी एकादशीची  व्रत कथा (Devuthani Ekadashi Vrat Katha)

एका राजाच्या राज्यात सर्वांनी एकादशीचे व्रत ठेवले. त्या राज्यातील प्रजेपासून ते प्राण्यांपर्यंत कुणालाच एकादशीच्या दिवशी जेवण दिले जात नव्हते. एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती राजाकडे आली आणि म्हणाली - महाराज, कृपया मला कामावर घ्या. तेव्हा राजाने त्याच्यापुढे एक अट घातली की ठीक आहे, ठेवू. पण रोज तुम्हाला जेवायला सगळं मिळेल, पण एकादशीला जेवण मिळणार नाही.

त्या व्यक्तीने त्यावेळी 'हो' म्हटले, पण एकादशीच्या दिवशी त्याला उपवासाचे पदार्थ दिल्यावर तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला - महाराज, याने माझे पोट भरणार नाही. मी भुकेने मरेन. मला खायला द्या. राजाने त्याला परिस्थितीची आठवण करून दिली, तरीही तो आपल्या शब्दावर ठाम राहिला आणि उपवास करण्यास तयार झाला नाही, तेव्हा राजाने त्याला पीठ, डाळी, तांदूळ इत्यादी दिले. नेहमीप्रमाणे तो नदीवर पोहोचला, आंघोळ करून अन्न शिजवू लागला. जेवण तयार झाल्यावर तो देवाला म्हणू लागला, हे देवा भोजन तयार आहे.

त्याच्या हाकेने भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज रूपात पितांबर धारण करून आले आणि त्याच्यासोबत प्रेमाने भोजन करू लागले. अन्न ग्रहण करून देव अंतर्धान पावले आणि तो आपल्या कामाला गेला.पंधरा दिवसांनी पुढच्या एकादशीला तो राजाला म्हणू लागला, महाराज मला दुप्पट सामग्री  द्या. त्या दिवशी मी उपाशी राहिलो. राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की, देवही आपल्यासोबत जेवतो. म्हणूनच ही सामग्री आम्हा दोघांसाठी पूरणारी नाही.

तरीही देव आला नाही, मग प्राण अर्पण करण्याच्या उद्देशाने तो नदीकडे निघाला. आपल्या प्राणाची आहुती देण्याचा त्याचा दृढ निश्चय जाणून, लवकरच देव प्रकट झाले आणि त्यांनी त्याला थांबवले व त्यांनी एकत्र बसून जेवण केले. जेवण झाल्यावर त्यांनी त्याला आपल्या विमानात बसवून आपल्या निवासस्थानी नेले. हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय उपवासाचा फायदा नाही. यातून राजाला ज्ञान प्राप्त झाले. त्यानेही मनापासून उपवास सुरू केला आणि शेवटी स्वर्गप्राप्ती झाली.

Edited By- नितीश गाडगे

डिस्केमर- ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT