Dev Uthani Ekadashi 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Dev Uthani Ekadashi 2023 : देवउठणी एकादशी कधी? महत्त्व आणि वेळ काय? वाचा सविस्तर

Dev Uthani Ekadashi : देवउठणी एकादशी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते.

Shraddha Thik

Dev Uthani Ekadashi Importance :

देवउठणी एकादशी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. देवउठणी एकादशीचा दिवस श्री हरी विष्णूला समर्पित आहे. या दिवशी जगाचे पालनपोषण करणारे श्री हरी विष्णू त्यांच्या चार महिन्यांच्या योगनिद्रातून जागे होतात. यानंतर सर्व शुभ (Shubh) कार्य सुरू होतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याशिवाय देवउठणी एकादशी ही भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी खूप शुभ मानली जाते. या दिवशी काही लोक भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि पूजा करतात. या दिवशी खऱ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा (Puja) केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशा परिस्थितीत जाणून घेऊया या वर्षीची देवउठणीची पूजा पद्धती आणि महत्त्व...

तारीख?

यावर्षी देवउठणी एकादशी 23 नोव्हेंबर 2023 रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णू 5 महिन्यांच्या झोपेनंतर जागे होतात. यानंतर सर्व शुभ कार्ये सुरू होतील. शालिग्राम आणि तुळशी मातेचा विवाह देवउठणी एकादशीला रात्री होतो.

मुहूर्त

कार्तिक शुक्ल एकादशीचा प्रारंभ - 22 नोव्हेंबर 2023, रात्री 11.03 वा.

कार्तिक शुक्ल एकादशीची समाप्ती - 23 नोव्हेंबर 2023, रात्री 09.01 वा.

पूजेची वेळ- सकाळी 06.50 ते 08.09

रात्रीच्या पूजेची वेळ - 05.25 ते रात्री 08.46 पर्यंत

पूजा पद्धत

देवउठणी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून भगवान विष्णूची पूजा करून उपवासाचा संकल्प करावा.

श्री हरी विष्णूच्या मूर्तीसमोर त्यांचा जागर करावा.

संध्याकाळी पूजास्थळी देवतांच्या समोर तुपाचे 11 दिवे लावावेत.

शक्य असल्यास उसाचा मंडप बनवून मध्यभागी विष्णूची मूर्ती ठेवावी.

ऊस, लाडू इत्यादी हंगामी फळे भगवान विष्णूला अर्पण करा.

एकादशीच्या रात्री तुपाचा दिवा लावावा.

दुस-या दिवशी उपवास सोडावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

Maharashtra Live News Update: वंजारी समाजाच्या ST प्रवर्गातील आरक्षणाच्या मुद्द्यांवरून युवकाची आत्महत्या

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू

Kanpur Blast: रस्त्याच्या कडेला उभ्या बाईकमध्ये अचानक मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT