Dengue  Saam TV
लाईफस्टाईल

Dengue : डेंग्यूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण; वेळीच सावध व्हा, वाचा लक्षणे आणि उपाय

Dengue Symptoms and Treatment : अमरावती जिल्ह्यात देखील डेंग्यूच्या आजाराने जोर धरला आहे. मागील 17 दिवसात 107 संशयित रुग्णांमध्ये 27 रुग्णांचा डेंगू अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Ruchika Jadhav

पावसाळा सुरू झाला की, मौज मजेसह आजारांनाही निमंत्रण मिळतं. राज्यात सध्या विविध जिल्ह्यांमध्ये डेंग्यू रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अनेक व्यक्तींना डेंग्यूची लागण झाली आहे. पावसात साठलेल्या पाण्यामध्येच डेंग्यूचे मच्छर तयार होतात. त्यांनी आपल्याला दंश केल्यावर डेंग्यूची लागण होते.

डेंग्यूसदृश आजाराने आणखी एक बळी, आरेफ कॉलनीतील मुलाचा मृत्यू

डेंग्यूसदृश आजाराने छत्रपती संभाजी नगर शहरातील आरेफ कॉलनीतील युसूफ शेख या मुलाचा मृत्यू झालाय. तीन दिवसांत डेंग्यूसदृश आजाराचा हा दुसरा बळी आहे. या वर्षात 35 जणांचा डेंग्यूसदृश्य तापामुळे मृत्यू झाला आहे. शहरात सर्दी, खोकल्यासह जुलाब, तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता देखील वाढलीये.

शहरातील आतापर्यंत डेंग्यूचे रुग्ण

जानेवारी: 8

फेब्रुवारी: 4

मार्च: 12

एप्रिल: 4

मे: 3

जून: 1

जुलै: 3

अमरावती जिल्ह्यात 17 दिवसात 27 डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण

अमरावती जिल्ह्यात देखील डेंग्यूच्या आजाराने जोर धरला आहे. मागील 17 दिवसात 107 संशयित रुग्णांमध्ये 27 रुग्णांचा डेंगू अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालीये. रुग्णसंख्येत 8 चिकनगुनियाचे पॉझिटिव्ह रुग्ण सुद्धा आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कीटकजन्य आजारापासून दूर राहण्यासाठी कोरडा दिवस पळावा व घराजवळ पाण्याचे डबके साचू न देता घरातील खिडक्यांना जाळी बसवण्याचे आव्हान सुद्धा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

डेंग्यूची साधी लक्षणे

डेंग्यूची लागण झालेल्या व्यक्तीला अधिक तीव्रतेचा ताप, डोळे येणे आणि डोके दुखी होणे, अशक्तपणा, तोंडाला कोरड पडणे, उलट्या होणे, त्वचेवर लाल व्रण उठणे असे जाणवते.

डेंग्यूची तीव्रतेची लक्षणे

डेंग्यूच्या तीव्रतेच्या लक्षणांमध्ये व्यक्तीला फार जास्त प्रमाणात उचक्या लागतात, तळहात आणि तळपायांना खाज येते, भूक कमी लागणे किंवा मळमळणे वाढते, हिरड्यांमधून तसेच नाकातून रक्तस्त्राव होतो.

उपाय

डेंग्यू आजार होऊ नये यासाठी आधीच काळजी घेतली पाहिजे. घराशेदजारील परिसरात पाणी साठू देऊ नका. घरात मच्छर येणार नाहीत याची काळजी घ्या. तसेच संबंधित लक्षणे जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT