Rare December Supermoon to Light Up the Sky Tomorrow google
लाईफस्टाईल

Supermoon Date And Time: चंद्र येणार पृथ्वीच्या अगदी जवळ... सुपरमून दिसणार, कधी आणि किती वाजता? जाणून घ्या

December Supermoon: उद्या ४ डिसेंबरला मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्तजयंतीच्या दिवशी दुर्मिळ सुपरमून दिसणार आहे. चंद्र १४% मोठा आणि ३०% अधिक तेजस्वी दिसणार असून भारतीयांना रात्रभर दर्शन मिळणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

उद्याच्या आकाशात एक दुर्मिळ आणि मोहक खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच दत्तजयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी म्हणजेच गुरुवार, ४ डिसेंबर रोजी 'सुपरमून' दिसणार आहे. इतकेच नाही तर चंद्र नेहमीपेक्षा जास्त मोठा, तेजस्वी रूपात आकाशात चमकणार आहे. पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी याबाबत माहिती दिली.

चंद्र पृथ्वीपासून किती अंतरावर असतो?

साधारणपणे चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. मात्र या मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्राची पृथ्वीपासूनची जवळीक कमी होऊन ते अंतर केवळ ३ लाख ५६ हजार ९६२ किलोमीटर राहणार आहे. चंद्र पृथ्वीच्या एवढा जवळ आल्यानं तो आकाशात नेहमीपेक्षा तब्बल १४ टक्के मोठा दिसणार आहे. एवढंच नाही तर या जवळकीचा परिणाम त्याच्या चमकदारपणावरही होणार असून चंद्राचा प्रकाश जवळपास ३० टक्क्यांनी वाढून तो जास्त तेजस्वी आणि मनमोहक दिसण्याची शक्यता आहे.

सुपरमून किती वाजता दिसणार?

या विलक्षण दृश्याचा आनंद संपूर्ण भारतभरातील नागरिकांना घेता येणार आहे. चंद्र सायंकाळी ५.१८ वाजता पूर्व दिशेला उगवेल आणि त्यानंतर रात्रभर आकाशात त्याचे दिमाखदार रूप पाहायला मिळणार आहे. पुढच्या दिवशी सकाळी ७.१४ वाजता पश्चिमेकडे मावळेपर्यंत त्याचे दर्शन घेता येईल. जवळपास १४ तासांहून अधिक काळ आकाशात हा चमकदार पूर्ण चंद्र झळाळत राहणार आहे.

पुन्हा सुपरमून पाहायला मिळेल का?

असा तेजस्वी आणि मोठा चंद्र दिसण्याचा हा योग दुर्मिळ असतो. पुढील सुपरमून भारतातून २४ डिसेंबर २०२६ रोजी पाहायला मिळेल, असेही सोमण यांनी सांगितले. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी आणि आकाशनिरिक्षणाची आवड असणाऱ्यांसाठी उद्याची रात्र अतिशय खास ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 'या' दिवशी समुद्राला मोठी भरती; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन|VIDEO

Thursday Horoscope: दत्त जयंतीला मिळणार 'या' ४ राशींना धनलाभ; मेषला गुंतवणुकीचा फायदा, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या कॅबिन क्रू आणि ग्राउंड स्टाफचं कामबंद आंदोलन

World Largest Parrot: जगातील सर्वात मोठा पोपट कोणता?

Anganewadi Jatra: कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी गाव आहे तरी कुठे? यात्रेची खास परंपरा

SCROLL FOR NEXT