हिंदू पंचागानुसार भगवान दत्तात्रेयांची जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा ही दत्त जयंती २६ डिसेंबरला साजरी (Celebrate) केली जाणार आहे. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अंश मानले जातात.
यंदा ही मार्गशीर्ष पौर्णिमा २६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सुरु होईल तर दुसऱ्या दिवशी २७ डिसेंबर २०२३ ला सकाळी ६ वाजून २ मिनिटांनी समाप्ती होईल. यादिनानिमित्त तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप (WhatsApp) स्टेटसला श्रीदत्त जयंतीनिमित्त सुंदर स्टेटस ठेवू शकता आणि तुमचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही पाठवू शकता.
1. गुरूवीण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
2. धावत येसी भक्तांसाठी,
ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
3. भीती कशाची जेव्हा दत्त उभा पाठिशी
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
4. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः
॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥
सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, समृद्धी,शांती
तुमच्या जीवनी वसो, दत्ता चरणी ही प्रार्थना
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
5. आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
6. त्रिमूर्ती हा अवतार
दत्तरूपी साकार
त्रिभुवनी पसरे भक्तीचा सागर
होता साक्षात्कार घडतो चमत्कार
गुरूमाऊली चरणी माझा नमस्कार
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
7. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा
नेति नेति शब्द न ये अनुमाना
सुरवर-मुनिजन योगी समाधी न ये ध्याना
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
8. दत्त येऊनी उभा ठाकला, भावे साष्टांगेसी प्रणिपात केला
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, जन्ममरणाचा फेरा चुकवीला
दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.