हिंदू धर्मानुसार भगवान दत्तात्रेयांची जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अंश मानले जाते. त्यांना गुरु आणि देव या दोघांचेही अवतार मानले जाते. म्हणून त्यांना श्रीगुरुदेवदत्त आणि परब्रह्ममूर्ती सद्गुरु असेही म्हणतात.
दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांची जयंती साजरी केली जाते. यंदा ही जयंती २६ डिसेंबरला साजरी (Celebrate) केली जाणार आहे. यादिवशी दत्तात्रेय देवाची उपासना केल्याने त्रिमूर्तीचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते.
1. दत्तात्रेय जयंती कथा
पौराणिक कथेनुसार एकदा नारदजींनी महर्षी अत्रि मुनींची पत्नी (Wife) यांची त्याच्या पतीवरील भक्तीबद्दल प्रशंसा केली. त्यावेळी देवी सती, देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती त्या ठिकाणी उपस्थित होत्या. नारदमूनी गेल्यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी मिळून अनुसयेची परीक्षा घेण्याचे ठरविले. तिन्ही देवांनी ऋषींमूनींचा वेश धारण करुन आश्रमात पोहोचले. माता अनुसयाने भिक्षुकांच्या वेशात पाहून भिक्षा आणली तिन्ही देवांनी ती स्विकारण्यास नकार दिला.
2. ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे रुपांतर
तिन्ही देवांनी अनुसयेकडे स्तनपान करण्याची मागणी केली. माता अनसूया पतिव्रता नारी असल्यामुळे त्यांना निराश न करण्याचे वचन देऊन त्यांचे लहान बालकांत रूपांतर करते व स्तनपान करून झोपवते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे खरे रूप दाखवत वर मागण्यास सांगतात. अनसूया त्यांच्याकडे तुम्ही माझी बालके व्हावीत म्हणून वर मागते. तेव्हापासून ह्या तिघांचा एकत्रित संगम म्हणजे श्री दत्तात्रेय होय.
3. दत्तजयंतीचे महत्त्व
दत्त जयंतीला सात दिवस गुरुचरित्राचे पारायण केले जाते. याला गुरुचरित्रसप्ताह असे म्हटले जाते. या दिवशी दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्तात्रेय हा शब्द 'दत्त' व 'आत्रेय' या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. तर 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.