Daily योग : वजनवाढीने त्रस्त आहात?; मग नियमित करा नौकासन SaamTv
लाईफस्टाईल

Daily योग : वजनवाढीने त्रस्त आहात?; मग नियमित करा नौकासन

नौकासनाचे फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलत्या काळाप्रमाणे आपल्या आहार आणि विहार या दोघांमध्येही बदल झाला आहे. घरी तयार केलेले पौष्टिक व सकस पदार्थ सोडून आपला कल फास्टफूडकडे वळला आहे. चवीने रुचकर आणि चमचमीत वाटणारे हे पदार्थ डोळे आणि जीभ यांना कायमच आकर्षित करत असतात. परंतु, हे पदार्थ कितीही छान वाटत असले तरीदेखील त्याचे शरीरावर होणारे परिणाम हे गंभीर आहेत. Daily Yoga: Suffering from weight gain ? Then do regular Naukasana

आज अनेकजण मधुमेह, कोलेस्ट्रॉल, वाढतं वजन या समस्यांनी त्रस्त आहेत. म्हणूनच या समस्यांवर मात करायची असेल तर नियमितपणे योग किंवा व्यायाम करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी योगासनांमधील नौकासन हे आसन अत्यंत प्रभावी ठरत आहे. हे आसन नियमित केलं तर वाढलेलं वजन नियंत्रणात येतं. सोबतच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासही मदत करतं.

हे देखील पहा -

नौकासनाचे फायदे -

१. ओटीपोट आणि मांड्यांमधील स्नायू बळकट होतात.

२. पचनसंस्थेतील रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत होते.

३. हात व पाय यांचे स्नायू बळकट होतात.

४. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

५. खांदे, मान, पार्श्वभाग यांचे स्नायू मजबूत होतात.

६. वजन नियंत्रणात राहते.

७. शरीराचं संतुलन राखण्यास मदत मिळते.

नौकासन करण्याची योग्य पद्धत

नौकासन करण्यासाठी प्रथम पाठीवर झोपावे. त्यानंतर दोन्ही हात, डोके आणि पाय एका सरळ रेषेत वर उचलावे. आपले पाय जमिनीपासून ४५ अंश कोनात वर उचलावेत. आणि, शरीराचा वरचा भाग पायांसोबत कमरेत काटकोन करेल अशा पद्धतीने उचलावा. (हे करत असताना तुमच्या शरीराची स्थिती एका नौकेप्रमाणे भासत असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT