Daily योग : भुजंगासन केल्यावर होतील 'या' ७ समस्या दूर

योगासनांमधील भुजंगासन या योग प्रकाराविषयी...
Daily योग : भुजंगासन केल्यावर होतील 'या' ७ समस्या दूर

Daily योग : भुजंगासन केल्यावर होतील 'या' ७ समस्या दूर

SaamTv 

Published On

शरीराच्या योग्य वाढीसाठी सकस आहारासोबत व्यायाम करणंही तितकंच गरज आहे. आजकाल प्रत्येक जण स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जीम, डान्स क्लास या पाश्चात्य पद्घतीकडे वळताना दिसत आहे. परंतु, असाही एक वर्ग आहे जो योगच्या माध्यमातून मन आणि शरीर या दोघांचही स्वास्थ्य जपत आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे प्राचीन काळापासून योग करण्यावर भर दिला गेला आहे. Benefits of Bhujangasana

योग करण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. विशेष म्हणजे हे योगप्रकार २ किंवा ३ नसून असंख्य आहेत. आणि, त्यांचे शरीर व मनाला होणारे फायदेदेखील तितकेच भिन्न आहेत. म्हणूनच योगासनांमधील भुजंगासन या योग प्रकाराविषयी आज आपण जाणून घेऊयात.

हे देखील पहा -

भुजंगासन करण्याचे फायदे -

१. श्वसनाची क्षमता वाढते.

२. पाठदुखी दूर होते आणि मणक्याचे स्नायू मोकळे होतात.

३. मासिक पाळी, गर्भाशय आणि अंडाशयाच्या समस्या दूर होतात.

४. जर भूक मंदावली असेल तर हे आसन केल्यावर भूक वाढण्यास मदत मिळते.

५. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

६. ओटीपोटातील स्नायू मोकळे होतात.

७. पोटाचे विकार दूर होतात. तसंच यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्याही कमी होण्यास मदत मिळते.

<div class="paragraphs"><p>Daily योग : भुजंगासन केल्यावर होतील 'या' ७ समस्या दूर</p></div>
योगसाधना: जाणून घ्या, पर्वतासन करण्याचे फायदे

भुजंगासन कसे करावे?

प्रथम जमिनीवर पालथे झोपून पाय सरळ रेषेत ठेवावे. यावेळी दोन्ही पायाची पावले व टाचा एकमेकांना स्पर्श करतील याची खात्री करावी. त्यानंतर हाताचे तळवे जमिनीवर ठेवून खांद्याखाली घ्यावे. हाताचे कोपरे शरीराला लागून समांतर असावेत. एक दीर्घ श्वास घेऊन हळूहळू डोके, छाती, पोट उचलावं परंतु, यावेळी नाभीचा स्पर्श जमिनीवरच असू द्यावा. आता हातांचा आधार घेत तुमचे शरीर जमिनीपासून उचलून मागे टाचेकडे खेचा. पाठीतील प्रत्येक मणका एकामागे एक कमानीत येईपर्यंत, सावकाश श्वास घेत रहा. जास्तीत जास्त मागे ताणून तुमचे हात सरळ राहतील असा प्रयत्न करा. डोके मागे घेऊन हात जमिनीवर सरळ येतील असे पहा. त्यानंतर श्वास सोडत आपले पोट, छाती व डोके जमिनीवर टेकवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com