लाईफस्टाईल

Culture of Kolhapur : कोल्हापूरला कलेचे माहेरघर का म्हणतात?

Mruga Vartak

कोल्हापूर ही कलेची पंढरी आहे. साहित्य, चित्र, हस्तकलेपासून लावणी, कुस्ती अशा सौष्ठव सौंदर्य दाखवणाऱ्या कला क्रीडा कोल्हापुरातून उदयाला येतात. रंगाभूमीची समृद्ध परंपरा असलेल्या कोल्हापुराला चित्रपट सृष्टीची स्वप्न पडावीत यात काही नवल नाही. आज कोल्हापूर शहराला आपण चित्रपट कलेची पंढरी म्हणून ओळखतो. पण मुळात चित्रपट हे अनेक कलांचे एकत्रित स्वरूप आहे. नुकतीच कोल्हापुरातील केशवराव भोसले रंगमंदिराला त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आग लागली. त्यानंतर हा मुद्दा चर्चेत आहे. त्यानिमित्ताने कोल्हापूरच्या कलाइतिहासाचा घेतलेला हा मागोवा.

कोल्हापूरला कला आणि संस्कृतीचा श्रीमंत वारसा लाभला आहे. कला साहित्य संगीताला राजाश्रय आवश्यक असतो. छत्रपती शाहू महाराजांच्या रूपाने कोल्हापूरला तो मिळाला आणि कोल्हापूरच्या पुढच्या अनेक पिढ्यांचे कल्याण झाले. या समृद्ध कलाविश्वाची नांदी ज्या छत्रपतींनी केली त्यांच्या संकल्पनेतून उभारलेलं रंगमंदिर स्वातंत्र्यानंतर केशवराव भोसले यांच्या नावाने ओळखू लागले.

शाहू महाराजांनी नेहमीच कलाकारांना आणि नवं काही करू इच्छिणाऱ्यांना वाव दिला आहे. केशवराव स्वतः गायक आणि नट होते. तेव्हा सर्व संगीत नाटकं कोल्हापूरच्या या रंगामंदिरात व्हायची. मराठी चित्रसृष्टीची सुरुवात याच कोल्हापूरपासून झाली. यासाठी कारणही तसेच होते. संगीतकार, कवी, नट, गायक, रंगभूषाकार, नेपथ्य कार, वेशभूषा, नृत्यांगना, जवाहिरे असे सर्व लोक एकाच शहरात पाहायचे ते कोल्हापूरात सहज मिळत.

अनेक अजरामर चित्रपटांची कोल्हापूर मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळात निर्मिती झाली. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी "जयप्रभा स्टुडिओ"ची निर्मिती केली. तसेच रंकाळा तलावाच्या पिछाडीस शालिनी सिने स्टुडिओ होता. रा. स्व. संघाचा राग म्हणून म. गांधींच्या मृत्यूनंतर भालजींचा स्टूडिओ उध्वस्त केला गेला. त्यानंतर लता मंगेशकरांनी स्वखर्चाने हा स्टुडिओ घेउन भालजींना चालवायला दिला. सध्या फक्त कोल्हापूर चित्रनगरी हेच शूटिंगसाठी ठिकाण उपलब्ध आहे.

शाहू महाराज, शिवा काशीद,रत्नाप्पा कुंभार,रणजित देसाई, सूर्यकांत मांडरे, चंद्रकांत मांडरे, कुलदीप पवार, भालजी पेंढारकर, बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम, दादा कोंडके, सुरेश वाडकर, लता मंगेशकर, आशुतोष गोवारीकर, जयंत नारळीकर, सुधीर फडके, जगदीश खेबूडकर, उमा भेंडे, राम कदम, राजशेखर, वसंत शिंदे, शिवाजी सावंत, बाबा कदम, सुरेश वाडकर, विश्वास नांगरे पाटील, दादू चौगुले, राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, वीरधवल खाडे, राजन गवस, गणपत पाटील, अभिजीत कोसंबी, उत्तम कांबळे, रमेश पोवार, अवधूत गुप्ते, प्रियदर्शन जाधव, ऋषिकेश जोशी,सदाशिवराव मंडलिक अशा अनेक मान्यवरांनी आपल्या कर्तृत्वाने कोल्हापूरचे नाव उंचावले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Saraf: महाराष्ट्राच्या महानायकाची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री

Marathi News Live Updates : सायबर हेल्पलाईनच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी वाचवले १ कोटी रुपये

Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेचं नेमकं गणित

SCROLL FOR NEXT