कोल्हापुरात नाट्यगृहाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संपूर्ण जगभर प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापुरातील खासबाग कुस्ती मैदानाच्या शेडला आग लागली, सदर घटना काल रात्री साडेदहाच्या सुमारास घडली असून या आगीने संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली आहे. या आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं आहे. अग्निशमन दलाच्या १५ तै २० गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये बहुतांश भाग हा लाकडाचा आहे. त्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.