एखाद्या मोठ्या किंवा गंभीर आजाराचं निदान करायचं असेल तर डॉक्टर आपल्याला सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देतात. आजकाल हॉस्पिटल, क्लिनिक आणि प्रयोगशाळांमध्ये आरोग्य तज्ञ सीटी स्कॅन मशीनचा वापर शरीराचं स्कॅन करण्यासाठी करतात. यामुळे अंतर्गत दुखापतींपासून ते कॅन्सरच्या प्रारंभापर्यंतची माहिती मिळू शकेल. परंतु अमेरिकेत अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात या तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराबद्दल गंभीर आरोग्याच्या समस्या उद्वभवू शकतात.
जामा इंटरनॅशनल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या स्टडीनुसार, सीटी स्कॅनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे दरवर्षी हजारो लोक कॅन्सरचे बळी ठरत असल्याचं समोर आलं आहे. या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेत दरवर्षी होणाऱ्या नवीन कॅन्सरच्या प्रकरणांपैकी सुमारे ५% प्रकरणं सीटी स्कॅनशी संबंधित रेडिएशनमुळे होतात.
सीटी स्कॅन किंवा कॉम्प्युटेड टोमोग्राफी स्कॅन हे एक विशेष प्रकारचे एक्स-रे मशीन आहे जे शरीराच्या अंतर्गत भागांच्या 3D प्रतिमा तयार करतात. ते सामान्य एक्स-रेपेक्षा जास्त स्पष्ट आणि सखोल माहिती देण्यास मदत मिळते.
सीटी स्कॅनमध्ये, एक मशीन शरीराभोवती फिरवलं जातं. यावेळी ते वेगवेगळ्या कोनातून एक्स-रे घेतं. यानंतर, कॉम्प्युटरच्या मदतीने त्या फोटांना एकत्र करून एक फोटो तयार केला जातो. ज्यामुळे डॉक्टरांना अवयव, हाडं, नसा आणि ऊतींची स्थिती स्पष्टपणे पाहता येते. अंतर्गत दुखापती, मेंदूचा झटका, कॅन्सर, रक्ताच्या गुठळ्या, फुफ्फुसांच्या समस्या यांसारख्या प्रकरणांमध्ये याचा वापर केला जातो.
संशोधकांनी अभ्यासात म्हटलंय की, अमेरिकेत गेल्या १५ वर्षांत सीटी स्कॅनमध्ये ३०% वाढ झाली आहे. त्यापैकी ५% कॅन्सरचे रुग्ण या रेडिएशनचे बळी असू शकतात. म्हणजेच दरवर्षी १,०३,००० लोकांना या कारणाने कॅन्सर होतोय.
सर्व डॉक्टर या अभ्यासाशी सहमत नाहीत. डेन्मार्कच्या हेरलेव्ह हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर लार्स थोर ब्योर्न जेन्सन यांनी या अभ्यासावर टीका केलीये. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा अभ्यास अपूर्ण माहितीवर आधारित आहे. या अभ्यासात प्रत्येक रुग्णाला किती रेडिएशन देण्यात आले आणि किती वेळा स्कॅन करण्यात आला हे सांगितले गेलेलं नाही. कधीकधी कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर स्कॅन केलं जातं. अशा परिस्थितीत, अतिरिक्त रेडिएशन त्यांच्यासाठी नवीन धोका निर्माण करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.