Cracked Heels Home Remedies Saam Tv
लाईफस्टाईल

Cracked Heels Home Remedies : पावसाळ्यात भेगा पडलेल्या टाचांची कशी घ्याल काळजी ? तुमच्या स्वयंपाकघरात सापडेल उपाय

Monsoon Care Tips : घाणीच्या पाण्यामुळे अनेकांना इन्फेक्शन होण्याची भीती असते.

कोमल दामुद्रे

How To Heal Cracked Feet Overnight : पावसाळ्यात अनेकांना टेन्शन येते ते आपल्या त्वचेचे. पावसाळा हा ऋतू जितका आल्हादायक तितकाच किळसवाणा वाटतो. घाणीच्या पाण्यामुळे अनेकांना इन्फेक्शन होण्याची भीती असते.

सतत पाण्यात काम केल्यामुळे स्त्रियांना तर ही चिंता अधिक सतावते. पावसाळा व हिवाळा या ऋतूमध्ये अनेकांच्या पायांना भेगा पडतात. यावेळी पाय मऊ सूत होण्याऐवजी ते अधिक कडक होतात. हे असे का होते याबाबत तुम्हाला काही माहितेय का ?

शरीरातील पौष्टिकतेची (Protein) कमतरता, सोरायसिस, थायरॉईड आणि संधिवात यांसारखे आजारही टाचांच्या भेगा पडण्यास कारणीभूत आहेत. ज्याची काळजी (Care) न घेतल्यास अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतात. तीव्र वेदनांसोबत रक्तस्त्रावही सुरू होतो. त्यामुळे यावर मात करण्यासाठी स्वयंपाकघरातील हे पदार्थ (Food) फायदेशीर ठरतील. जाणून घेऊया त्याबद्दल

1. लिंबू, ग्लिसरीन आणि गुलाब पाणी

बादलीमध्ये कोमट पाणी घ्या व त्यात लिंबाचा रस, एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा गुलाबजल टाका. आता त्यात तुमचे पाय १५-२० मिनिटे भिजवा. त्यानंतर पायाच्या स्क्रबरने घोट्या स्क्रब करा. यानंतरही एक चमचा ग्लिसरीन, एक चमचा गुलाबपाणी आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून पायाला लावा आणि मोजे घाला. रात्रभर पायांवर राहू द्या. सकाळी स्वच्छ धुवा. सतत वापर केल्याने, टाच काही दिवसात मऊ होऊ लागतात.

2. मध

एका बादलीच्या पाण्यात एक कप मध मिसळा. त्यात 15-20 मिनिटे पाय बुडवा. नंतर घोट्यांना घासून घ्या. स्क्रब केल्यानंतर कोमट पाण्याने पाय धुवा. असे नियमित केल्याने पायांना आराम मिळेल.

3. नारळाचे तेल

नारळाच्या तेलाने भेगा पडलेल्या टाचांना मसाज करा. यानंतर मोजे घाला. रात्रभर पायाला तेल लावून तसेच ठेवा व सकाळी स्वच्छ धुवा. हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपचार आहे.

4. कोरफड जेल

बादली कोमट पाण्याने भरा. घोट्यांना 5-10 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर पाय स्वच्छ करुन कोरडे करा. आता त्यांच्यावर कोरफडीचे जेल लावा. यानंतर मोजे घाला आणि कोरफडीचे जेल टाचांवर रात्रभर राहू द्या. सकाळी पाण्याने धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Boat accident: समुद्रात नाव उलटली, १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू; ११६ जण बेपत्ता

Maharashtra News Live Update: पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

SCROLL FOR NEXT