कोमल दामुद्रे
बऱ्याचदा ट्रेंडनुसार आपण नवीन सँडल किंवा बूट विकत घेतो.
चप्पल चावल्यावर पायाला खूप त्रास होतो. यावर उपाय म्हणून आपण लगेचच एखादी क्रीम किंवा बँडेज लावतो.
सँडलमुळे पायाला सूज येते, फोड येतात किंवा जखमा होतात.
पायात सँडल अधिक घट्ट किंवा त्यांचा रुंदीमुळे पायांना ठेच लागते.
अशावेळी आपण काय करायला हवे हे जाणून घेऊया
नवीन चप्पल पायला चावल्यानंतर जखम होते यावेळी खोबऱ्याचे तेल लावा
मधाचा वापर केल्याने पायांना ओलावा येऊन आपले पाय लवकर बरे होतील.
तांदळाच्या पिठाची पेस्ट करुन जखमेवर लावल्यास आराम मिळतो.
कोरफड जेल पायांच्या जखमेवर लावल्यास जखम भरण्यास मदत होते.
रात्री झोपताना जखमेवर थोडीशी टूथपेस्ट लावावी व सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने धुवावी. त्यानंतर त्यावर पेट्रोलियम जेली लावावी.