Diabetes Health, Coriander Water Benefits  Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Health : मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे कोथिंबीरचे पाणी, रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

Coriander Water Benefits : आहारात काही गोष्टीचा समावेश केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते. यासाठी आपण काही घरगुती उपाय करु शकतो. त्यासाठी आहारात कोथिंबीरचे पाणी फायदेशीर ठरेल.

कोमल दामुद्रे

How To Control Blood Sugar :

सध्या जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या साखरेच्या समस्येमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. तर सध्या याचे बळी तरुण देखील पडत आहे.

मधुमेह (Diabetes) होण्याचे कारण अनियमित जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव आणि आनुवांशिकता असू शकते. मधुमेहाच्या आजारात (Disease) इन्सुलिन कमी होऊ लागतो. त्यामुळे शरीरातील साखरेची (Sugar) पातळी वाढू लागते.

आहारात काही गोष्टीचा समावेश केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते. यासाठी आपण काही घरगुती उपाय करु शकतो. त्यासाठी आहारात कोथिंबीरचे पाणी फायदेशीर ठरेल.

1. कोथिंबीरचे फायदे

कोथिंबीरमध्ये अँटीडेटॉक्स आणि अँटीसेप्टिक गुणधर्मांव्यतिरिक्त, कोथिंबीरमध्ये कॅल्शियम, कॅरोटीन, लोह, पोटॅशियम, थायामिन आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. हे केवळ मधुमेहावर नाही तर अॅनिमिया, कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.

सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीरचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहाते. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. याचे पाणी प्यायल्याने साखरेची पातळी कमी होते आणि इन्सुलिनचे प्रमाण वाढते.

2. पाणी कसे बनवाल?

हिरवी कोथिंबीर धुवून स्वच्छ पाने वेगळी करा. ग्राइंडरमध्ये दोन चमचे पाणी घालून बारीक करा. हे मिश्रण एका ग्लास पाण्यात टाकून उकळा. चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घाला. यामुळे पचनक्रिया सुधारेल तसेच साखरेची पातळी नियंत्रणात राहिल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक, अमरावतीनंतर यवतमाळमध्येही लव्ह जिहाद? 'यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता'

Maharashtra News Live Update: अक्षयतृतीयाला गौराईचे वाजत-गाजत विसर्जन,आदिवासी परंपरा

विदर्भ भाजतोय! अकोला-वर्ध्यात तापमान ४५° पार, उष्णतेचा कहर

कोलकात्यात रिंकू सिंहचं वादळ, KKRने मिळवला पहिला विजय; अतितटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स पराभूत

Gold Rate: सोनं २ लाखांवर पोहोचणार? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT