दिवाळी म्हटलं की, गोडाधोडाचे पदार्थ हमखास आलेच. दिवाळीमध्ये अनेक तेलाचे, तूपाचे व गोडाचे पदार्थ बनवले जातात व या पदार्थांची चव देखील चाखली जाते. परंतु, हे पदार्थ खाताना आपल्याला अधिक चिंता वाटू लागते ती, रक्तातील साखरेचे (Sugar) प्रमाण व वजन वाढण्याची. (Latest Marathi News)
अनेकदा आपल्याला हवे असणारे पदार्थ देखील आपण खाऊ शकत नाही. परंतु, जर तुम्हाला या पदार्थांची चव चाखायची असेल व आरोग्याची (Health) काळजी घ्यायची असेल तर या पदार्थांचा आपल्या आहारात नक्की समावेश करा
जिऱ्याचे पाणी: जर तुम्हाला नैसर्गिकरित्या चयापचय वाढवायचा असेल तर दररोज जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करा. जिऱ्यामध्ये असलेले गुणधर्म केवळ पोटच नाही तर शरीरातील साखरेची पातळीही नियंत्रणात ठेवतात. रोज रात्री जिरे पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी हे पाणी प्यायल्याने फायदा होईल.
कोरफड ज्यूस : आरोग्य, त्वचा आणि केस या सर्वांची काळजी फक्त कोरफडीने घेतली जाऊ शकते. कोरफडीमध्ये अँटीबॅक्टेरियलसह अनेक गुणधर्म असतात. दररोज कोरफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होते आणि साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. केवळ सणासुदीच्या काळातच नाही तर दैनंदिन जीवनातही यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
मेथीचे दाणे: मेथीमध्ये प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, लोह, फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्वे ए, सी, के, बी, मँगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, जस्त, फायबर आणि पाणी असते. आतापासून मेथी दाणे भिजत घाला आणि सकाळी त्याचे पाणी प्या.
योग : निरोगी राहण्यासाठी केवळ खाण्यापिण्याचीच नव्हे तर शारीरिक हालचालींचीही काळजी घेणे आवश्यक आहे. सणासुदीच्या काळात साखरेची पातळी योग्य ठेवायची असेल तर रोज किमान ४० मिनिटे योगासने करा. याशिवाय तुम्ही चालु किंवा धावू शकता.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.