Hair Care Tips
Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips : केसांचा गुंता सतत होतोय? मग या टिप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hair Looks Good : आपला लूक परफेक्ट दिसण्यासाठी केसांची फार महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे केसांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. गोंधळलेल्या केसांच्या समस्या प्रत्येकजण अनुभवतो. तसेच ज्या व्यक्तीचे केस कुरळे असतात त्याचे केस अधिक जास्त केस गुंतलेले असतात.

केसात (Hair) गुंता होण्याचे कारण म्हणजे बाहेरील धूळ, प्रदूषण आणि केस व्यवस्थित न विंचरणे हे आहेत. केसात गुंता होऊन केस तुटणे,केस गळणे, केसांची चमक कमी होणे, केस कमजोर या समस्या निर्माण होतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला केसातील गुंता सोडवण्यासाठी काही टिप्स (Tips) सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया टीप्स काय आहेत.

केसातील गुंता सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने काढण्यासाठी या टीप्सचे पालन करा -

1 रुंद-दात असलेला कंगवा किंवा ब्रश वापरा -

ब्रश किंवा रुंद-दात असलेला कंगवा केसातील गुंता काढण्यासाठी वापरा कारण या दोन्ही गोष्टी बारीक दात असलेल्या कंगवापेक्षा अधिक सौम्य आहे. म्हणून केसातील गुंता काढणे हे कढीण काम सोपे होते.

2 कंडिशनर किंवा डिटेंगलिंग स्प्रे लावा -

कंडिशनर किंवा डिटेंगलिंग स्प्रे लावल्याने केसातील गुंता सहज दूर करता येतो. त्यामुळे लिव्ह – इन कंडिशनर यासारख्या प्रॉडक्टचा वापर करायला हवा. त्यावर गोंधलेल्या केसांना कंगवा करणे सोपे होते.

3 केस विभक्त करा -

केसांमध्ये खूप गुंता असल्यामुळे केस जास्त खेचू नये त्यामुळे केस ताणले जातात आणि तुटतात. त्यामुळे केस लहान लहान सेक्शनसमध्ये विभागून घ्या आणि केसांना कंगवा करा.

4 केस हळुवारपणे विलग करा -

केसातील गुंता काढण्यासाठी जास्त खेचणे टाळा. केसांमध्ये हट्टी गाठी असतील तर तोडण्याऐवजी सौम्य हाताने काढण्याचा प्रयत्न करा.

5 ओल्या केसांना कंगवा करू नका -

ओल्या केसांना कंगवा करू नका कारण त्यावेळेस केस अधिक नाजूक असतात. त्यामुळे कंगवा केल्याने केस तुटण्याची शक्यता असते. केसांना कंगवा करण्याआधी केस कोरडे करून घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: क्रुरतेचा कळस! पत्नीने पतीला साखळीने बांधलं; घरात कोंडून केली मारहाण... धक्कादायक VIDEO

LSG vs KKR: KKR कडून पराभवाचा बदला घेण्यासाठी लखनऊचा संघ उतरणार मैदानात! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Today's Marathi News Live : पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ मोदी घेणार बीडमध्ये सभा

Bike Stunt Video Viral: भयंकर! भररस्त्यात तरूणाची बाईकवर स्टंटबाजी, पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा

Jalana News: ब्रेकिंग! मंत्री रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घातला घेराव... जोरदार घोषणाबाजी; जालन्यात काय घडलं?

SCROLL FOR NEXT